महाराष्ट्र

Maharashtra Elections 2025: अखेर प्रतिक्षा संपली! नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा; असं आहे टाईम-टेबल

Maharashtra Elections 2025: अनेक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर आज जाहीर झाल्या आहेत. त्यामुळं राज्यात सगळीकडं राजकीय धुरळा पाहायला मिळणार आहे.

Amit Ujagare

Maharashtra Elections 2025: राज्यात गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. यावेळी नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, २ डिसेंबर २०२५ मतदान होणार असून ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. 246 नगरपरिषदा, ४२ नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळं आता राज्यात सगळीकडं राजकीय धुरळा पाहायला मिळणार आहे.

असा असेल कार्यक्रम?

  1. नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर २०२५

  2. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत - १७ नोव्हेंबर २०२५

  3. नामनिर्देशनपत्राची छाननी - १८ नोव्हेंबर २०२५

  4. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल नसलेल्या) - २१ नोव्हेंबर २०२५

  5. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल असलेल्या) - २५ नोव्हेंबर २०२५

  6. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी - २६ नोव्हेंबर २०२५

  7. मतदानाचा दिवस - २ डिसेंबर २०२५

  8. मतमोजणीचा दिवस - ३ डिसेंबर २०२५

  9. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस - १० डिसेंबर २०२५

नामनिर्देशनाचे अर्ज दाखल करण्याचे नियम

नामनिर्देशन हे ऑनलाईन स्विकारलं जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर हे उपलब्ध असणार आहे. एका प्रभागात एका उमेदवाराला जास्तीत जास्त ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. वेबसाईटवर नामनिर्देशपत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं ते सबमिट करावं लागेल. नामनिर्देशनासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. पण जर पूर्वीच जात वैधता प्रमाणपत्रासाठी उमेदवारानं अर्ज दाखल केलेला असेल आणि नामनिर्देशन दाखल करण्याच्या तारखेपर्यंत जर त्यांच्याकडं ते उपलब्ध नसेल तर त्यांना याचा अर्ज केल्याची पावती सादर करुन ते दाखल करता येईल. पण असा उमेदवार अंतिमतः निवडून जर आला तर त्याला ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक राहील.

मतदारांना किती मत द्यावी लागणार

नगपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीनं होणार आहे. यामध्ये एका प्रभागात सर्वसाधारणपणे २ जागा असतात. पण जर आकडा विषम असेल तर एका प्रभागात ३ जागा असतात. त्यामुळं इथं मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल. याशिवाय नगरपरिषदेचा एक अध्यक्ष असेल त्यासाठी देखील मतदान करावा लागेल. नगरपंचायतमध्ये १ सदस्य आणि १ अध्यक्ष असल्यानं मतदारांना इथं दोन मत द्यावी लागतील.

उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती?

उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामध्ये 'अ' वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी १५ लाख रुपये, सदस्यपदासाठी ५ लाख रुपये. तर 'ब' वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार रुपये आणि सदस्यपदासाठी ३ लाख ५० हजार रुपये. 'क' वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ७ लाख ५० हजार रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख ५० हजार रुपये इतकी खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसंच नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ६ लाख रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार अशी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT