Prashant Padole: प्रशांत पडोळे बालीश! मोदी, फडणवीसांवरील विधानावरुन बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule Slams Prashant Padole: खासदार पडोळे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, आरोप करण्यापूर्वी किमान त्यांनी आपल्या नेत्यांचा सल्ला तरी घ्यावा,अशी सूचना करून बावनकुळे यांनी ३२ हजार कोटी रुपये सरकारने पूरग्रस्तांसाठी राखून ठेवले असल्याचे सांगितले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule On Congress : Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: महायुती सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला होता. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. पडोळे हे अपघाताने खासदार झाले आहेत. सरकारवर कुठलाही आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. प्रगल्भता दाखवायला हवी असे सांगून त्यांनी खासदारांचा उल्लेख 'बालीश' असा केला.

खासदार पडोळे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, आरोप करण्यापूर्वी किमान त्यांनी आपल्या नेत्यांचा सल्ला तरी घ्यावा,अशी सूचना करून बावनकुळे यांनी ३२ हजार कोटी रुपये सरकारने पूरग्रस्तांसाठी राखून ठेवले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याही आरोपांचा समाचार घेतला.

Chandrashekhar Bawankule
Heena Gavit: भाजपमध्ये घरवापसी केल्यानंतर माजी खासदाराचा 'एकला चलो'चा नारा; शिंदेसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका

उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नसल्याचा दावा केला होता. यावर बावनकुळे यांनी प्रस्ताव पाठवला नसता तर केंद्रीय पथक मदत देण्यासाठी आले तरी असते का असा सवाल त्यांना केला. केंद्रीय पथक हे महत्त्वाचे आहे. ते शेतकरी आणि पूरग्रस्तांना संपूर्ण संरक्षण करून मदत करणार आहे. केंद्र आणि राज्याची भूमिका आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. उद्धव ठाकरे यांना फक्त आरोपच करता येतात. राजकीय वेळ मारून नेण्याचे काम ते करीत आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न विरोधकांचे सुरू आहेत.

Chandrashekhar Bawankule
Maval Politics: शेळके-भेगडेंचा खेळ फसला! मतदारांना ‘अंधश्रद्धेच्या धाग्याने’ बांधण्याचा प्रयत्न; मनगटावर धागे, गळ्यात ताईत

कुठल्याही राज्याची निवडणूक आटोपली आणि पराभव झाली की काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात निघून जातात. बिहार निवडणुकीच्या निकालानंतरही हेच बघायला मिळणार आहे. त्यांनी विदेशात जाण्याचे तिकीटही आत्तापासूनच काढू ठेवावे असा टोलाही बावनकुळे यांनी काँग्रेसला लगावला.

शेतकऱ्यांना दोन चार रुपयांच्या मदतीच्या पावत्यांवरही बावनकुळे यांनी रोष व्यक्त केला. काहीही झाले तरी हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचा चेक देऊ शकत नाही. याची चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्याने चूक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांची थट्टा करणे योग्य नाही. ही थट्टा कोणी केली हे तपासावे लागले, असा इशाराही महसूलमंत्र्यांनी दिला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com