Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागासाठी 12 मे रोजी मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेतील आमदारातून निवडून द्याव्यावच्या या निवडणुकीत संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे नऊपैकी आठ आमदार निवडून येतील असे दिसते तर महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे.
सहा वर्षापूर्वी म्हणजे 18 मे 2020 मध्ये या नऊ जागांसाठी निवडणूक झाली त्यावेळी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे अनिवार्य होते. त्यामुळे त्यावेळी या नऊ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, आता परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या विधान परिषदेच्या रणधुमाळीत दहाव्या उमेदवाराची एन्ट्री झाल्यास घोडेबाजाराला ऊत येणार आहे. त्यामुळे 'क्रॉस व्होटिंग'चा फटका नेमका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महायुतीच्या वाट्याला नऊ पैकी आठ जागा येणार आहेत. त्यामध्ये भाजपच्या वाट्याला पाच तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. तर यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादी या तीन पक्षाना एकच जागा मिळणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नुकतीच झालेली राज्यसभा जागा आधीच मिळाली आहे. त्यामुळे या जागेवर आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसचा दावा आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे निवृत्त हॊणार असल्याने त्यांनी निवडणूक लढविण्याचे ठरवले तर काँग्रेस माघार घेणार आहे.
भाजपचे पाचही उमेदवार निवडून येणार
आगामी काळात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेचं संख्याबळ 288 इतके आहे. त्यानुसार विधानपरिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची 29 मते मिळवणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे भाजपचे १३५ आमदार असल्याने त्यांच्या पाच जागा निवडून येतील. त्यांना दहा मतांची आवश्यकता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे दहा ते १२ मते अतिरिक्त आहेत. हे मतदान भाजपला मिळू शकते त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून येऊ शकतात.
एकनाथ शिंदेंच्या सेनेला दोन जागा मिळणार
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेकडे 57 आमदार असल्याने त्यांच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. त्यामुळे त्यांचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी 58 मतांची आवश्यकता आहे. विधानसभेत शिंदे गटाकडे ५७ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे दोन आमदार सहज निवडून येणार आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर संधी
महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा येऊ शकते. विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे 40 आमदारांचे संख्याबळ आहे. उर्वरित दहा ते बारा मतदान ते भाजपच्या पारड्यात टाकू शकतात. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री या एकमेव जागेसाठी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आघाडीच्या वाट्याला एकच जागा पण अतिरिक्त 17 मते
महाविकास आघाडीमधील एकच उमेदवाराला निवडणूक जिंकून येण्यासाठी आकडेमोड करावी लागणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीपैकी काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे 29 आमदारांच्या पाठिंब्यावर तीन पक्षाला मिळून एक जागा मिळणार आहे. त्याशिवाय अतिरिक्त 15 ते 16 मतदान राहणार आहे. मात्र, आघाडीने दुसरा उमेदवार दिल्यास जवळपास दहा ते 12 मतदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे आघाडी दुसरा उमेदवार देण्यासही शक्यता कमी आहे. दोन वर्षसपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेस आता ताकदेखील फुंकून पिणार आहे.
त्यातच 9 जागेसाठी महायुतीकडून दहावा उमेदवार दिल्यास मात्र, निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापणार आहे. ऐनवेळी महायुतीने निवडणुकीचा खेळ बदलण्यासाठी जर दहावा उमेदवार दिल्यास तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता असून या निवडणुकीत क्रॉस मतदानाचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.