Legislative Council Elections : एकनाथ शिंदेंचा 'या' नावाला हिरवा कंदील, विधान परिषदेची उमेदवारी महिला नेत्याला!

Eknath Shinde Shivsena : विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंकडून महिला नेत्याची उमेदवारी निश्चित केली असल्याची माहिती आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : विधान परिषदेसाठी मतदान 12 मे रोजी होणार आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. 9 जागांपैकी त्यांच्या वाट्याला दोन जागा येत आहेत. त्यातील एक उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

निलम गोऱ्हे या पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होत्या. शिंदे त्यांच्याबाबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता होती. दरम्यान, शिंदेंनी गोऱ्हेंच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे निलम गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

दोन जागांसाठी शिंदेंच्या पक्षातील अनेक नेते इच्छुक आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळालेल्या शितल म्हात्रे, शायना एनसी यांच्या नावाची चर्चा देखील विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आहे. मात्र, विधान परिषदेतील कामाचा अनुभव आणि उपसभापती म्हणून निलम गोऱ्हे यांनी बजावलेली कामगिरी पाहात त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
vidhanparishad Election: विधानपरिषदेसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच! नीलम गोऱ्हेंसह 'ही' नावे चर्चेत; कोणाची लागणार लॉटरी, कोणाचा पत्ता कट होणार?

दुसऱ्या जागेसाठी चुरस

निलम गोऱ्हे यांना एक जागा निश्चित मानली जात असताना आता दुसऱ्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उमदेवारी मिळावी म्हणून नेत्यांनी गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिंदे दुसऱ्या जागेसाठी कोणाला पाठींबा देणार याची देखील चर्चा सुरू आहे.

उमेदवारीसाठी या नेत्यांची नावे चर्चेत

दुसऱ्या जागेसाठी रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शायना एनसी, शितल म्हात्रे,अभिजित अडसुळ भाऊसाहेब चौधरी यांची नावे चर्चेत आहेत. राज्यसभेप्रमाणे एकनाथ शिंदे ऐनवेळी धक्कातंत्र आवलंबत नवीन नाव देणारी की प्रस्थापित नेत्याला संधी देणार याची देखील चर्चा आहे.

Eknath Shinde
Legislative Council Elections : फडणवीस हे प्रशांत परिचारकांना दिलेला शब्द पाळणार की राऊत-सातपुतेंना संधी देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com