Harshvardhan Sapkal speaking in Pune about MVA strategy and Congress claiCongress leader Harshvardhan Sapkal extends support to Uddhav Thackeray for Legislative Council election.  Sarkarnama
महाराष्ट्र

MLC election 2026 : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट? उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत सस्पेंस कायम! हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत ठाकरेंच्या भेटीला

Maharashtra politics News : महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच विधानसभेतील संख्याबळ पाहता या नऊ जागांपैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. तर दोन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला तर एक जागा अजित पवार यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येत आहे. तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येत आहे, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळेच गुरुवारी दिवसभरात उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली.

महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येत आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे निवृत्त होत असल्याने ही जागा रिक्त होत आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेची निवडणूक लढणार असतील तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे यांच्या सेनेला ही जागा सोडण्यास तयार आहेत. मात्र, ठाकरे लढणार नसतील तर या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे.

दुसरीकडे या जागेवर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर ठाकरे यांच्या सेनेकडून इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. त्यामध्ये विधानपरिषदेच्या या एकमेव जागेसाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी आमदार वैभव नाईक, युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या चार नेत्यापैकी एकाला ठाकरे यांच्या सेनेकडून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे.

त्यातच आता विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असल्याने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळेच आता आघाडीकडून भेटीगाठीवर व भर दिला जात आहे.

विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे लढविणार का यावरून सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढविणार नसतील तर ती जागा काँग्रेसला (Congress) सोडावी या मागणीवर काँग्रेस ठाम असून त्यासाठीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत काय रणनीती ठरविण्यात आली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT