MVA Rajya Sabha Candidate: राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला! 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?; काँग्रेसच्या बड्या नेत्याची माहिती

MVA Rajya Sabha Candidate: महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, कारण केवळ एकाच जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती.
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, कारण केवळ एकाच जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती. पण आता हा सस्पेन्स संपला असून या एका जागेवरील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यानं याबाबत खुलासा केला आहे. यानंतर तिन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Iran-USA War: आखाती देशात निर्यात महागली! इमर्जन्सी सरचार्ज लागू; कुठल्या वस्तूंना बसणार फटका? शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान

वडेट्टीवारांची घोषणा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, "पवारसाहेब ज्येष्ठ आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणारे आहोत. तो धर्म पाळून महाविकास आघाडी एकत्र राहावी, ती मजबुतीनं पुढे जावी, येणाऱ्या आव्हानांना आणि येणाऱ्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना ही आमची सातत्यानं भूमिका राहिली आहे. म्हणून आमच्या हायकमांडनं कदाचित पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा असं आमचं मत झालेलं आहे. आत्ताच आम्हाला फोनही आला आमच्या प्रभारींचा त्यात त्यांनी म्हटलं की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे"

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Iran-USA War: आखाती देशात निर्यात महागली! इमर्जन्सी सरचार्ज लागू; कुठल्या वस्तूंना बसणार फटका? शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान

शिवसेनेनंही स्पष्ट केली भूमिका?

काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता दुसरीकडं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील ट्विट करत एकप्रकारे शिवसेनेची भूमिका मांडली आहे. पण त्यातही त्यांनी स्पष्टपणे काहीही न बोलता सूचकपणे शरद पवारांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. कारण सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका होती तरी संजय राऊतांनी मात्र शरद पवारांच्याच नावाला पंसती दर्शवली होती. ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, "कांग्रेसने महाराष्ट्रातील राज्य सभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे! महाविकास आघाडी एक आहे एकत्र राहील! जय महाराष्ट्र!"

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
BJP News : भाजपाच्या धक्कातंत्राने, कराड, रहाटकर, दानवे, मुंडेंचा पत्ता कट; मराठवाड्यातून राज्यसभेवर तिसरा खासदार

भाजपची यादी जाहीर

दरम्यान, उद्या राज्यसभेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं आजच महायुतीकडून देखील राज्यसभेसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपने चार उमेदवारांची नावं जाहीर केली त्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माया ईवनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांच्या नावाचा समावेश आहे. ईवनाते व वडकुते यांना उमेदवारी जाहीर करत भाजपने आपली धक्कातंत्राची शैली कायम ठेवली आहे. उर्वरित दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांच्या नावाची आधीच वर्णी लागली आहे.

ईवनाते या नागपूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या त्या सदस्याही आहेत. भाजपने आदिवासी समाजाला प्रतिनिधीत्व म्हणून ईवनाते यांची निवड केली. तर दुसरीकडं वडकुते हे हिंगोलीचे रहिवासी असून त्यांनी लोकसभेवेळी भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं आहे. तसंच ते विधान परिषदेचे माजी आमदारही होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्षही आहेत. त्यामुळं वडुकते यांच्या रुपानं धनगर समाजाला भाजपनं राज्यसभेवर जाण्याची संधी दिली आहे.

महाविकास आघाडीचा गोंधळ

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून मावळत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाचा आग्रह कायम होता. आदित्य ठाकरेंची त्यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची मागणी होत होती. शरद पवार यांचं वय आणि प्रकृतीतील अस्थिरता पाहता यंदा ते निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळं शिवसेनेनं मविआची एकमेव जागा ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दुसरीकडं काँग्रेसनं देखील राज्यसभेतील विरोधीपक्ष नेतेपद कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या या एकमेवर जागेवर दावा सांगितला होता. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी यासाठी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चाही केली होती. काँग्रेसला जर राज्यसभेची जागा सोडली तर त्या बदल्यात राज्यात विधानपरिषदेची एक रिक्त जागा ही उद्धव ठाकरेंसाठी सोडण्याची तयारी दर्शवली होती. पण या सर्व गोंधळात शरद पवारांची नेमकी भूमिका काय याची मात्र चर्चा होत नव्हती. पण आता त्यांचं नाव या जागेसाठी पुढे आल्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Raj Thackeray: ठाकरे बंधुंमध्ये बिनसलं! राज ठाकरेंच्या नाराजीवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, आम्ही...

राज्यसभेचा निवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण ७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार, यामध्ये महायुतीच्या वाट्याला ६ त महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ १ जागा आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com