Maharashtra MLC Election Results: राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ११ विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांवरील निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यात एका मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला भोपळा मिळाला आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मोठी आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि विजयासाठी आवश्यक असलेला कोटा सहज पूर्ण केला. या निकालामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, अमरावतीत भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसला अत्यंत नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळवता आले नाही, त्यामुळे पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
पक्षांतर्गत मतभेद, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि संघटनात्मक विस्कळीतपणाचा फटका काँग्रेसला बसल्याचे स्पष्ट दिसून आले. या मतविभाजनाचा थेट फायदा भाजपचे प्रवीण पोटे यांना झाला आणि त्यांनी एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
प्रवीण पोटे (भाजप): ३९० मते
निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी): ३१ मते
हर्षजित देशमुख (काँग्रेस): ० (शून्य) मते
1. छत्रपती संभाजीनगर - जालना : सुहास शिरसाट ( भाजप)
2. ठाणे : रवींद्र फाटक शिवसेना) – बिनविरोध
3. रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
4. पुणे : विक्रम काकडे ( राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
5. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी ( शिवसेना) – बिनविरोध
6. नाशिक : गोकुळ गिते ( अपक्ष, भाजप समर्थक)
7. भंडारा - गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर ( भाजप)
8. वर्धा - गडचिरोली - चंद्रपूर : अरुण लखाणी ( भाजप) – बिनविरोध
9. अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे ( भाजप) – बिनविरोध
10. सांगली - सातारा : धैर्यशील कदम ( भाजप)
11. धाराशिव - लातूर - बीड : बसवराज पाटील ( भाजप)
12. नागपूर : राजीव पोतदार ( भाजप)
13. जळगाव : नंदकिशोर महाजन ( भाजप)
14. परभणी - हिंगोली : सईद खान ( शिवसेना)
15. सोलापूर : राजेंद्र राऊत ( भाजप)
16. अमरावती : प्रवीण पोटे ( भाजप)
17. नांदेड : अमर राजूरकर ( भाजप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.