

MLC Election Result Maharashtra News: राज्यातील १७ विधान परिषद जागांपैकी ६ जागांवर महायुतीने यापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला होता. उर्वरित ११ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. 17 पैकी 16 जागांवर महायुतीने बाजी मारली आहे.
या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने जोरदार वर्चस्व सिद्ध करत दणदणीत यश मिळवले आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची मते फुटल्याचे स्पष्ट दिसून आले असून, त्याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाल्याचे चित्र समोर आले आहे.
धाराशिव-बीड-लातूर या मतदारसंघात भाजपच्या बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांना पराभवाची धूळ चारली. बसवराज पाटील यांनी ७२१ मतांचे राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेतले असण्याची शक्यता आहे. येथेही महाविकास आघाडीच्या मतांना मोठा धक्का बसला.
धाराशिवमध्ये मतमोजणीपूर्वीच भाजपच्या विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते, निकाल जाहीर होण्याआधीच विजयाचा दावा करणाऱ्या या बॅनर्सची जिल्हाभर चर्चा सुरू झाली होती.
भाजपकडून मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. या मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत झाली येथे 99.49 टक्के मतदान झाल्याने निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती
बसवराज पाटील (भाजप): ८४५ मते
महेश देशमुख (काँग्रेस): १२४ मते
अवैध/कोऱ्या मतपत्रिका: १४
नाशिकमध्ये महायुतीला धक्का, अपक्ष गिते विजयी
नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत धक्कादायक विजय मिळवला. या मतदारसंघात विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. गिते यांच्या विजयामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.