Chhatrapati Sambhajinagar MLC: जालना-छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपने जिंकली; सुहास शिरसाठ विक्रमी मतांनी विजयी

Chhatrapati Sambhajinagar MLC BJP candidate Suhas Shirsath won: जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाठ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांचा पराभव केला.
Suhas Shirsat
Suhas ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजी नगर : जालना छत्रपती संभाजी नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ शिवसेनेकडून खेचून घेत भाजपने अखेर जिंकला. महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुहास शिरसाठ यांनी तब्बल 454 मते मिळवली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मते मिळाली आहेत. तर एमआयएमच्या उमेदवाराला 35 मते मिळाली आहेत.

जालना छत्रपती संभाजी नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा महायुतीने राखली असून पूर्वी ही जागा शिवसेनेकडे होती. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून अंबादास दानवे यांनी विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवला होता. ही जागा शिवसेनेकडेच राहावी यासाठी स्थानिक नेत्यांनी जोर लावला होता परंतु नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत भाजपने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला संख्याबळाच्या बाबतीत मागे टाकले होते.

Suhas Shirsat
Pension App: पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर! ‘Maha-UPLABDHI’ 1 जुलैपासून सुरू; सर्व माहिती मोबाईलवर

जालना महानगरपालिका भाजपने स्वबळावर लढत तिथे महापौर, उपमहापौर सभापती अशी सगळीच महत्त्वाची पदे आपल्याकडे राखली होती हीच परिस्थिती छत्रपती संभाजी नगर मध्ये देखील पाहायला मिळाली. जालन्याप्रमाणेच संभाजीनगर महापालिकेची निवडणूक ही भाजपने शिवसेनेची युती न करता स्वबळावर लढवली होती सत्ता स्थापनेच्या वेळेस भाजपने तेरा नगरसेवक असलेल्या शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर पद दिले मात्र महापौर आणि स्थायी समिती सभापती पद आपल्याकडेच ठेवले.

Suhas Shirsat
Teacher News: जुनी अट हटवली! संस्थांतर्गत बदल्यांबाबत नवे आदेश, शिक्षक आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय

जिल्हा परिषदेतही शिवसेना-भाजपची कागदावर युती झाली मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजप 24 सदस्यांसह मोठा पक्ष ठरला. निवडणुकीत युती करूनही उमेदवार उभे करणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चक्क 23 सदस्य असलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद उपाध्यक्ष पद आणि महत्वाची सभापती पदे आपल्याकडे ठेवत शिंदे यांच्या शिवसेनेला बेदखल केले होते.

भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी या दोन्ही निवडणुकीमध्ये सूत्र आपल्या हाती घेत शिवसेनेला नमती भूमिका घेण्यास भाग पाडले होते याचाच परिणाम म्हणून जालना आणि छत्रपती संभाजी नगर या दोन्ही जिल्ह्यातील संख्याबळाचा दाखला देत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेकडे असलेली ही जागा खेचून आणण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले होते.

Suhas Shirsat
MLC Election Results: निकाल जाहीर होण्याआधीच उमरग्यात झळकले भाजपच्या विजयाचे बॅनर

शिवसेनेकडून कुठलाही दगा फटका होऊ नये याची काळजी वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत घेतली होती त्यामुळे भाजपच्या सुहास शिरसाठ यांचा विजय निश्चित मानला जात होता. महाविकास आघाडीचे फारसे आव्हान त्यांना नव्हते. महाविकास आघाडीने देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी दिली होती,

मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेचे गटनेते गणेश लोखंडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. संख्याबळ नसल्याने त्यांना 134 मतांवर समाधान मानावे लागले. एम आय एम ने इसाक खान यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 35 मते मिळाली. मतांची आकडेवारी पाहता क्रॉस वोटिंग फारसे झालेले दिसत नाहीत. विजय उमेदवार सुहास शिरसाठ हे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सुहास शिरसाट यांच्या विजयाने भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या आता चार झाली आह

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com