Mumbai News : राज्यातील 246 नगरपालिका व 42 नागरपंचायतीसाठी चुरशीने मतदान पार पडले. रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच मतमोजणीच्या पूर्वसंध्येला महाएक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार राज्यात सर्वाधिक 122 नगराध्यक्ष भाजपचे निवडून येत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 42 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगराध्यक्ष विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर महायुतीचे वर्चस्व असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या बाबत साम टीव्हीकडून राज्यात महाएक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यासोबतच थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे 40 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 14 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 नगराध्यक्ष निवडून येथील असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत स्थानिक विकास आघाडीचे 10 तर इतर 17 नगराध्यक्ष विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील नगरसेवक पदाच्या 6 हजार 859 नगरसेवक पदांच्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 2 हजार 370 नगरसेवक भाजपचे (BJP) निवडून येत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 927 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 633, तर शहर विकास आघाडीचे 222 नगरसेवक विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे 773 तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे 255 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 187 नगराध्यक्ष निवडून येथील असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत स्थानिक विकास आघाडीचे व अपक्ष 222 नगरसेवक विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यातील 288 नगरपालिका व 43 नागरपंचायतीसाठी मतदान पार पडले आहे. त्यामुळे रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याची प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष?
भाजप - 122
शिवसेना (एकनाथ शिंदे) - 42
राष्ट्रवादी (अजित पवार)- 36
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- 07
शिवसेना (ठाकरे) - 14
शहर विकास आघाडी - 10
इतर - 17
एकूण - 288
कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक?
भाजप - 2370
शिंदेसेना - 927
काँग्रेस - 773
राष्ट्रवादी (अजित पवार) -633
ठाकरेसेना - 255
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 187
इतर - 1492
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.