Congress News: उद्धव ठाकरेंचा 'तो' प्लॅन खटकला; काँग्रेसची मुंबई महापालिकेसाठी तडकाफडकी सर्वात मोठी घोषणा

BMC Election 2026: शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे त्यांच्या शिवसेनेसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.भाजप आणि एकनाथ शिंदेंसह काँग्रेसचंही तगडं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेतील सत्ता राखणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Congress Uddhav Thackeray Shivsena  (1).jpg
Congress Uddhav Thackeray Shivsena (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई,पुणे यांसारख्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजप, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच मनसेनंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तयारी सुरू केली असतानाच काँग्रेसनं (Congress) मुंबई महापालिकेसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

विधानसभेनंतर खटक्यावर खटके उडत असलेल्या महाविकास आघाडीत अखेर फूट पडली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.याचवेळी काँग्रेसनं या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत आमने सामने उभे ठाकणार आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी(ता.20) मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आगामी निवडणूक पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून हवा तसा विकास झालेला आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणार्‍या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच लक्ष्य केलं आहे.

रमेश चेन्निथला म्हणाले,आम्ही भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसनं पुकारलेल्या या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी सोबत यावं असं आवाहनही केलं आहे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Congress Uddhav Thackeray Shivsena  (1).jpg
Uddhav Thackeray News: भाजप अन् शिंदेंचा हिशेब चुकता करण्यासाठी ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा डाव टाकणार ; महायुतीच्या गोटात खळबळ

तसेच काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तुमच्यासमोर सादर करेन. म्हणूनच मतदारांनी आम्हाला साथ द्यावी, आम्ही मुंबईचा विकास करून दाखवू. मुंबईत आम्ही आम्ही भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या सगळ्यात सर्वांचं लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर राहणार आहे. शिवसेना (Shivsena) फुटल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे त्यांच्या शिवसेनेसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.भाजप आणि एकनाथ शिंदेंसह काँग्रेसचंही तगडं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेतील सत्ता राखणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Congress Uddhav Thackeray Shivsena  (1).jpg
BJP News : ऑपरेशन लोटसमध्ये 21 जणांची चर्चा, प्रत्यक्षात 11 जणचं गळाला : तटकरेंनी एका फोनवर घटवली भाजपप्रवेश करणाऱ्यांची संख्या

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी....

उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा पुढे करत आपलं राजकीय वैर मिटवून घेत युतीचे संकेत दिले आहेत.मुंबईसह इतरही काही निवडणुकांमध्ये मनसे शिवसेना युती निश्चित मानली जात असून अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.आता या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे मनसेनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Congress Uddhav Thackeray Shivsena  (1).jpg
Vijay Wadettiwar : निकालाची वाट कसली बघता.... गुलाल उधळायला सुरुवात करा : विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला

सध्यातरी उद्धव ठाकरेंची शिवसेना,शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस,आणि राज ठाकरेंची मनसे यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होण्याची दाट शक्यता आहे.महाविकास आघाडीतील मनसेच्या एन्ट्रीला जोरदार विरोध केलेल्या काँग्रेसला पवारांनी खडेबोल सुनावले होते. म्हणून भाजप,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह काँग्रेसचाही हिशेब चुकता करण्यासाठी उद्धव ठाकरे आता इरेला पेटले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com