Sadanand Date  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra DGP: CM फडणवीसांची मोठी खेळी; निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रात 'या' धडाकेबाज IPS अधिकाऱ्याची एन्ट्री

Mahayuti Government: महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारी 2026 ला सेवानिवृत्त होत आहेत. शुक्ला यांच्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती केली जाणार याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारी 2026 ला सेवानिवृत्त होत आहेत. शुक्ला यांच्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती केली जाणार याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं.राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी राज्य सरकारच्या गृहखात्याकडून सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मंजुरीसाठी यूपीएससीकडे पाठवण्यात आले होती. अखेर सदानंद दाते यांची राज्याचे नवे पोलिस महासंचालक (Maharahtra DGP) म्हणून नियुक्ती करणार आली आहे.

राज्य सरकारकडून बुधवारी (ता.31 डिसेंबर) राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए)प्रमुख असलेले सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सदानंद दाते यांना महाराष्ट्र केडरमध्ये परतण्यास मंजुरी दिल्यानं महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक निश्चित झाली होती.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या मुदतीपूर्व प्रतिनियुक्तीच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावास मंजुरी देत त्यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये परत पाठवले जात असल्याचे केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले होते. दाते यांना राज्यात परत पाठवण्याची विनंती राज्य सरकारकडून गृह मंत्रालयाला करण्यात आली होती.

सदानंद दाते यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. ते भारतीय पोलिस सेवेचे 1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. दाते यांची 1 एप्रिल 2024 रोजी‘एनआयए’च्या महासंचालकपदी नियुक्ती झाली होती.

तत्पूर्वी ते महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते.तसेच त्यांनी मुंबईतील सहपोलिस आयुक्त (गुन्हे) यासह अनेक महत्त्वाची पदांची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे.

केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कायदा आणि न्याय विभागात संयुक्त सचिव म्हणूनही काम केले होते. विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) 3 जानेवारी 2026 ला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर सदानंद दाते यांची नियुक्ती अपेक्षित आहे. राज्याचे पोलिस प्रमुख म्हणून त्यांना डिसेंबर 2027 पर्यंतचा दोन वर्षांचा कार्यकाळ दिला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

ही सात नावं होती चर्चेत

राज्याच्या गृह विभागाकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या यादीत राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दाते यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीव कुमार सिंगल, पोलिस महासंचालक (विधी व तांत्रिक) संजय वर्मा, पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण) अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे संचालक संजीव कुमार, गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार, पोलिस महासंचालक (रेल्वे पोलिस) प्रशांत बुरडे या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT