Anil Deshmukh, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : देशमुखांनी थेट पेनड्राईव्हच बाहेर काढला; फडणवीसांच्या गर्भित इशाऱ्यानंतर दंड थोपटले

Maharashtra Politics NCP NCP : अनिल देशमुखांनी बुधवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर फडणवीसांनीही देशमुखांना गर्भित इशारा दिला होता.

Rajanand More

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोघांनीही एकमेकांना व्हिडिओ क्लीप पब्लिक करण्याचा इशारा दिल्याने आता कुणाचा व्हिडिओ आधी बाहेर येणार याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे आपल्याकडे असल्याचा दावा करत त्या पब्लिक करण्याचा इशारा फडणवीस यांनी बुधवारी दिला होता. त्यानंतर देशमुख यांनीही आखाड्यात उतरत दंड थोपटले आहेत. आपल्याकडेही फडणवीसांचा व्हिडिओ असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे.

काय म्हणाले देशमुख?

फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारमार्फत माझ्यावर दबाव टाकून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याविरोधात खोटे अफिडेव्हिट करण्यास सांगितले होते. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे देशमुखांनी सांगितले. त्याचा पेनड्राईव्हच त्यांनी दाखवला.

फडणवीस यांनी काल त्यांच्याकडेही माझ्याविषयी व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडे असलेले व्हिडिओ जगजाहीर करावेत, असे आव्हानही देशमुखांनी दिले आहे. देशमुखांनीही फडणवीस यांना आव्हान दिल्याने दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत.

कशावरून सुरू झाला वाद?

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठी देशमुखांवर फडणवीसांनी दबाव टाक होता, असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता. या दाव्यांना देशमुख यांनीही बुधवारी दुजोरा दिला. त्यानंतर फडवणीस यांनी देशमुखांना गर्भित इशारा देत त्यांचे व्हिडिओ पब्लिक करू, असे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT