CM Eknath Shinde-Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांवर विश्वास दाखवला, प्रासंगिक करार कायम राहणार ?

Abdul Sattar Guardian Minister : शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार आहे, मी मुळचा शिवसैनिक नाहीच, जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. जेव्हा त्यांच्या माझ्यावरील विश्वास उडेल, तेव्हा मी निर्णय घेण्यास मोकळा असेल
Eknath Shinde, Abdul Sattar
Eknath Shinde, Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Politics News : गेल्या दीड महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार? याची चर्चा सुरू होती. भाजपने या पदावर दावा केल्याने शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असे चित्रही जिल्ह्यात निर्माण झाले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

सत्तार यांना पालकमंत्री पद मिळाल्याने पक्षात अंतर्गत खदखद असली तरी ती बाहेर येण्याची शक्यता तशी कमीच आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट या पदासाठी इच्छूक होते, पण ते मंत्रीच नसल्याने आणि विस्ताराची शक्यता धूसर असल्याने त्यांना संधी मिळणे कठीण होते. जिल्ह्याच्या राजकारणात संजय शिरसाट-अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात मतभेद असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहेत.

अशात मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार आहे, मी मुळचा शिवसैनिक नाहीच, जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. जेव्हा त्यांच्या माझ्यावरील विश्वास उडेल, तेव्हा मी निर्णय घेण्यास मोकळा असेल, अशी धमकी वजा इशारा देत अब्दुल सत्तार यांनी पक्ष नेतृत्वार आपला दबाव कायम ठेवण्याची खेळी केली होती.

Eknath Shinde, Abdul Sattar
Ambadas Danve On Abdul Sattar : भाजपचे निष्ठावंत किती अपमान सहन करणार ; सत्तारांना पालकमंत्री पद मिळताच अंबादास दानवेंनी डिवचले..

त्यांची खेळी पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यामुळे यशस्वी ठरली असेच म्हणावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तार यांच्यावर विश्वास दाखवत दोन महिन्यासाठी का होईना, त्यांना जिल्ह्याचे पालकत्व सोपवले आहे. पालकमंत्री पद पदरात पाडून घेत विधानसभा निवडणुकीआधी अब्दुल सत्तार यांनी हा मास्टर स्ट्रोक लगावल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

आता त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते विकास कामे कशी मार्गी लावतात? विरोधी आमदारांना निधी देतात का? स्वतःच्या मतदारसंघाला निधी देताना हा ढिला सोडतात का? महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मागण्यांना किती महत्व देतात? यावरून ही बैठक वादळी ठरणार की मग शांततेत पार पडणार? हे स्पष्ट होईल.

Eknath Shinde, Abdul Sattar
Abdul Sattar News : मुख्यमंत्री शिंदेंकडून सत्तारांवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी; भुमरेंचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा

तुर्तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास दाखवल्यामुळे अब्दुल सत्तार शिवसेनेशी केलेला प्रासंगिक करार आगामी विधानसभा निवडणुकीत कायम ठेवतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे यांना जालना लोकसभा मतदारसंघात उघडपणे मदत केली होती.

भाजपचे रावसाहेब दानवे यांचा त्यामुळे पराभव झाला होता. काळे यांना मदत केल्याने अब्दुल सत्तार यांची काँग्रेसशी जवळीक वाढली असून ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का देऊ शकतात, अशी चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. पालकमंत्री पदाची जबाबदारी सत्तारांकडे देण्यात आल्यामुळे ही चर्चा आता थांबेल, असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com