Ajit Pawar News : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' विधानसभेत गेमचेंजर ठरण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ठाकरे गटाच्या 'सामना'वृत्तपत्रातून या योजनेच्या अंमलबाजवणीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
'सामना'च्या अग्रलेखात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? असे म्हटले आहे.
या लाडक्या बहिण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीमधील तीनही पक्षात श्रेयवाद सुरू असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे जमतेम दीड हजाराची 'फुंकर' भगिनींना कितपत दिलासा देईल?
हाही प्रश्न आहे, या प्रश्नाची उत्तरे देयाची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे, असा टोला ठाकरे गटाने Thackeray group अग्रलेखातून लगावला आहे.
सरकार म्हणून घेतलेल्या निर्णयांना पक्षीय श्रेयाचे लेबल चिकटविण्याची उफराटी चढाओढ सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांबाबतही ‘बिघाडी’ सरकारच्या ‘तिघाडी’मध्ये तोच खेळ सुरू झाला आहे.
ज्या योजना मुख्यमंत्र्यांच्या CM Eknath Shinde नावे आहेत, त्या जणू ‘मिंधे’ गटाच्याच आहेत, अशा पद्धतीने प्रसिद्धीचा आटापिटा सुरू आहे. या अर्थसंकल्पाने जनहित कसे साधले आहे, याचा पाढा भाजपवले वाचणार आहेत. अर्थसंकल्प पोकळ असला तरी तिन्ही सत्तापक्ष हे आमचेच श्रेय म्हणत एकमेकांना लाथा घालत आहेत, असे म्हणत ठाकरे गटाने महायुतीला डिवचलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.