MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay  Sarkarnama
महाराष्ट्र

Om Rajenimbalkar: ठाकरेंचे 'ऑपरेशन मनधरणी' ऑन; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, ओमराजेंच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

Om Rajenimbalkar, Operation Tiger, Eknath Shinde: ऑपरेशन टायगरच्या चर्चेत खासदार ओम राजेनिंबाळकर केंद्रस्थानी आहेत. ठाकरे गटाने मध्यरात्री मनधरणी सुरू केली असून शिंदे गटानेही हालचाली वाढवल्या आहेत. त्यांच्या पुढील निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Sudesh Mitkar

Pune News: सध्या राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची प्रचंड चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरच्या चर्चेचा केंद्रबिंदू खासदार ओम राजेनिंबाळकर असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि सध्या ते नेमकं शिंदे की ठाकरेंच्या बाजूने झुकणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

लवकरच ओम राजेनिंबाळकर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांच्या सोबत जाण्याची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात असतानाच, शनिवारी (ता. २० जून) मध्यरात्री पुण्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरेंकडून खासदारांचे 'ऑपरेशन मनधरणी' सुरू करण्यात आले असून त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे.

'ऑपरेशन मनधरणी'

पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर राजकीय चक्रे वेगाने चक्र फिरली. ओम राजेनिंबाळकर पक्षाला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारी असतानाच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आला आहे. ओमराजेंची मनधरणी करण्यासाठी थेट मातोश्रीवरून 'दूत' रवाना करण्यात आले होते. शनिवारी (ता. २० जून) मध्यरात्री ठीक १ वाजता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे मुंबईवरून थेट पुण्यात ओमराजे यांच्या निवासस्थानी पोहोचले.

"निकाल अपेक्षित नव्हता"

या मध्यरात्रीच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, "ओमराजेंबाबत लागलेला निकाल अपेक्षित नव्हता. या निकालानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे आपण पक्ष सचिव म्हणून त्यांची भेट घेतली." मात्र, आतमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावर बोलताना सरदेसाई यांनी, "ज्या गोष्टींवर चर्चा झाली, ती उघड करायची असती तर मध्यरात्री चोरून भेटलो नसतो," असा सूचक इशारा दिला.

पुण्यातून धाराशिवकडे रवाना

ठाकरेंचे आमदार भेटून गेल्यानंतर ओम राजेनिंबाळकर हे पुण्याहून त्यांच्या मूळ गावी रवाना झाले. मात्र, यावेळी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. ओमराजे पुण्यातून निघताना त्यांच्या गाडीत शिवसेनेचे काही प्रमुख कार्यकर्ते देखील सोबत असल्याची माहिती समोर आली आहे. ओमराजेंनी कोणताही दुसरा निर्णय घेऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार 'फिल्डिंग' लावली गेल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

आता शिंदेंचा 'नेता' मैदानात

ठाकरेंचे आमदार भेटून गेल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला विश्वासू नेता मैदानात उतरवला आहे. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या खांद्यावर ओमराजे यांच्या संदर्भातील 'ऑपरेशन टायगर'ची जबाबदारी सोपवण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

यापुर्वी देखील खासदार ओम राजेनिंबाळकर यांना स्पेशल विमानाने तानाजी सावंत हे स्वतः दिल्लीला घेऊन गेले होते अशा चर्चा आहेत. त्यानंतर आता ठाकरेंचे आमदार भेटून गेल्यानंतर ओमराजे माघार घेण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या आदेशाने तानाजी सावंत पुण्याहून तातडीने धाराशिवकडे रवाना झाले आहेत. ओम राजेनिंबाळकर आणि तानाजी सावंत यांच्यात आज पुन्हा एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार ओम राजेनिंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. मात्र ठाकरेंच्या 'ऑपरेशन मनधरणी' मुळे शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' अलर्ट मोडवर आले असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT