Maharashtra School Admission Age Limit 2027-28  Sarkarnama
महाराष्ट्र

School Admission Age Limit: नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशाचे नियम बदलले! कोणत्या वर्गासाठी किती वय पूर्ण हवे? पालकांनो, जाणून घ्या नवा GR

Maharashtra nursery to first standard admission Age limit rules 2027-28 महाराष्ट्रात नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंतच्या शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे नियोजन आहे. पालकांनी शैक्षणिक वर्ष आणि ३० जूनची संदर्भ तारीख लक्षात घेऊन प्रवेशाचे नियोजन करावे.

Mangesh Mahale

Maharashtra School Admission Rules: महाराष्ट्रातील शाळांमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या पालकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी मुलांचे किमान वय टप्प्याटप्प्याने निश्चित करण्यात आले आहे. ही नवी व्यवस्था शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून लागू होणार असून, प्रत्येक वर्गासाठी वयाची गणना ३० जून या संदर्भ तारखेनुसार केली जाणार आहे.

नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीचे वय किती?

नव्या निकषांनुसार, पूर्वप्राथमिक वर्गांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी पुढीलप्रमाणे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

२०२७-२८ : बालवाटिका-१ अर्थात नर्सरीसाठी ३० जूनपर्यंत 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

२०२८-२९ : बालवाटिका-२ अर्थात ज्युनिअर केजीसाठी 4 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

२०२९-३० :बालवाटिका-३ अर्थात सिनिअर केजीसाठी 5 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

२०३०-३१ : इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

या टप्प्याटप्प्याच्या अंमलबजावणीमुळे पालकांना मुलांच्या जन्मतारखेनुसार शाळा प्रवेशाचे नियोजन करता येणार आहे. प्रवेशाच्या वेळी संबंधित शाळेच्या अधिकृत सूचना तपासणेही आवश्यक राहील.

पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांची अट

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या बालकाचे ३० जून रोजी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. मात्र, हा निकष शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पासून लागू केला जाणार आहे. त्यामुळे आगामी वर्षांतील प्रवेशासाठी पालकांनी संबंधित शैक्षणिक वर्षानुसार लागू होणारी वयोमर्यादा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

२०२६-२७ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?

शासन निर्णयातील तरतुदीनुसार, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नर्सरी ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या वर्गांमध्ये आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन वयोमर्यादेचे निकष लागू होणार नाहीत. मात्र, या तरतुदीचा अर्थ या वर्षातील सर्व नवीन प्रवेशांना वयोमर्यादेतून सूट आहे, असा होत नाही. नवीन प्रवेशासाठी लागू असलेले नियम स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.

वयामध्ये १५ दिवसांची सूट; पुढील वर्गासाठीही तरतूद

पूर्वप्राथमिक वर्गांपासून पहिलीपर्यंत प्रवेशासाठी किमान आणि कमाल वयाच्या निकषांमध्ये शाळाप्रमुख स्तरावर १५ दिवसांची सूट देण्याची तरतूद आहे. तसेच, मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना नव्या वयोमर्यादेच्या निकषांतून सूट देण्यात आली आहे.

या नियमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवेशाचे नियोजन करताना पालकांनी शासन निर्णयातील तरतुदी आणि शाळेकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचा आधार घ्यावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT