PM Poshan Yojana: शाळांतील स्वयंपाकी अन् मदतनिसांसाठी गुड न्यूज! 74 कोटी मंजूर; राज्य सरकारचा नवा GR

PM Poshan Yojana Maharashtra: पीएम पोषण योजनेंतर्गत शाळांमधील स्वयंपाकी आणि मदतनिसांच्या मानधनासाठी महाराष्ट्र शासनाने 74.10 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला.
PM Poshan Yojana Maharashtra
PM Poshan Yojana MaharashtraSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी आणि मदतनिसांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यासाठी सरकारने ७४ कोटी १० लाख ८१ हजार रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी दिली आहे.

योजनेंतर्गत सर्वसाधारण घटकातील स्वयंपाकी व मदतनिसांना दरमहा २५०० रुपये मानधन दिले जाते. यामध्ये केंद्राचा हिस्सा ६०० रुपये आणि राज्याचा हिस्सा ४०० रुपये, असा एकूण १००० रुपयांचा निधी आधीच वितरित करण्यात आला होता. मात्र, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या अतिरिक्त हिश्यातून दरमहा उर्वरित १५०० रुपये देण्यासाठी निधीची आवश्यकता होती.

वित्त विभागाच्या मान्यतेनुसार, अर्थसंकल्पित असलेल्या निधीमधून 'SNA SPARSH' प्रणालीअंतर्गत ७४.१० कोटी रुपयांचा निधी पुनर्विनियोजनाद्वारे (Re-appropriation) पीएम पोषण योजनेच्या राज्य हिश्याच्या लेखाशीर्षात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

डिजिटल प्रणाली आणि निधी वितरणाची प्रक्रिया

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून ही योजना 'SNA SPARSH' या ऑनलाइन प्रणालीवर ऑनबोर्ड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात (1st Mother Sanction) मंजूर केलेल्या केंद्र हिश्यातून राज्याला निधी उपलब्ध करून दिला होता. केंद्र आणि राज्य शासनाच्या ६०:४० या खर्चाच्या प्रमाणानुसार हा निधी वितरित केला जातो.

PM Poshan Yojana Maharashtra
PDCC Bank Election: राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा बँकेत शिवसेनेची एन्ट्री? शरद सोनवणे मैदानात उतरणार?

या निधीच्या आहरण व संवितरणाची जबाबदारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे राज्य समन्वय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सायबर कोषागाराद्वारे (कोषागार सांकेतांक ८१०१) ही रक्कम वितरीत केली जाणार आहे.

PM Poshan Yojana Maharashtra
Dhule ACB: दुष्काळातही शेतकऱ्यांची अडवणूक! 100 रुपयांची लाच घेताना वनरक्षक ACB च्या जाळ्यात

शासनाचे विहित मुदतीत खर्चाचे निर्देश

शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, वितरित करण्यात आलेला निधी चालू आर्थिक वर्षातच (२०२६-२७) नियमानुसार खर्च केला जावा. तसेच खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र (Utility Certificate) वेळेत सादर करण्याचे निर्देश शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांना देण्यात आले आहेत.

शासनाच्या या निर्णयामुळे हजारो स्वयंपाकी व मदतनिसांना वेळेवर मानधन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) नुकताच प्रसिद्ध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com