New highway projects in Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

New Expressway : महाराष्ट्राच्या नकाशावर येणार 3 नवीन 'द्रुतगती' महामार्ग; आता प्रवास होणार एकदम सुपरफास्ट!

New highway projects in Maharashtra update : महाराष्ट्रात 3 नवीन द्रुतगती महामार्ग उभारले जाणार असून प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. मार्ग, फायदे आणि महत्वाची माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

महाराष्ट्रात वाहतुकीच्या दृष्टीने मोठा बदल घडवून आणणारे 3 नवे द्रुतगती महामार्ग लवकरच उभारले जाणार आहेत. हे तीन महत्त्वाचे प्रकल्प मंजुरीच्या टप्प्यावरून पुढे सरकत असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक ठरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन मार्गाच्या काम वेगाने सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना या प्रकल्पांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. निविदा प्रक्रिया, अंतिम मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात यासाठी ठोस नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच, भूसंपादनासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी वित्त विभागाशी समन्वय साधून लवकर मार्ग काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विदर्भातील दळणवळण सोपे करणे आणि औद्योगिक विकासाला गती देणे हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश असून, पुढील 6 वर्षांत हे महामार्ग पूर्ण करण्याचा मानस आहे.

हे तिन्ही महामार्ग पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील शहरांमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार असून, व्यापार आणि उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

याचबरोबर, नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीही पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी वाहनतळ, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या कामांसाठी 1063 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT