Unseasonal Rain Relief; Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Unseasonal Rain Relief : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारचा मोठा निर्णय! आर्थिक मदत जाहीर

Maharashtra Government Unseasonal Rain Relief : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

Aslam Shanedivan

  1. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत जाहीर

  2. 1 लाख 80 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ

  3. नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून पुढील मदतीची शक्यता

devendra fadnavis cabinet meeting news : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे पिके जमीनदोस्त झाले होते. ज्यानंतर कोलमडलेल्या शेतकऱ्याने राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. तर विरोधकांनी देखील शेतकऱ्यांची बाजू लावून धरत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी केली होती.

यानंतर आज मंगळवारी (ता.७) झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत जाहीर केली. त्याशिवाय जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू करावी. त्यांना एनडीआरएफच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने कारवाई करावी असेही आदेश देण्यात आले आहे. दरम्यान राज्यात १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना फटका बसला होता. तर शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले होते. याच नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना सरकारने २८.८६ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचा प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

दरम्यान जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले आहे. तर २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला असून केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तर जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळीचा लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा आणि बीड जिल्ह्यांना फटका बसला आहे. यावेळी पाच लोकांचा मृत्यु झाला तर नऊ लोक जखमी झाले आणि ३६ जनावरे दगावली आहेत.

तसेच एप्रिलमध्ये देखील अवकाळीने राज्यातील शेतकऱ्यांना फटका दिला असून तब्बल १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले आहे. दरम्यान आता जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.

FAQs :

1. शेतकऱ्यांना किती मदत जाहीर करण्यात आली आहे?
128 कोटी 65 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे

2. किती शेतकरी या मदतीस पात्र आहेत?
सुमारे 1 लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे

3. ही मदत कशासाठी देण्यात आली आहे?
अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी

4. नुकसान कोणत्या कालावधीत झाले?
ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान

5. पुढील प्रक्रिया काय आहे?
जानेवारीपासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून पुढील मदत दिली जाईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT