Devendra Fadnavis : कुंभमेळ्यात काही चुकलं तर पहिली शिवी महाजन खातील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Nashik Kumbh Mela, Girish Mahajan : कुंभमेळामंत्री म्हणून गिरीश महाजन हे काम बघत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: शिखर समितीचे अध्यक्ष आहेत.
Girish Mahajan & Devendra Fadanvis
Girish Mahajan & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbmela : नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन हे काम बघत आहे. तर कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिखर समितीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष आहे.

नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप नाशिकच्या तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिर येथे झाला. सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत असल्याची माहिती फडणवीसांनी या बैठकीत दिली.

प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या सूक्ष्म आणि नेटक्या नियोजनासाठी नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रयागराजचा दौरा केला होता. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहा पट अधिक भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

Girish Mahajan & Devendra Fadanvis
Devendra Fadnavis : “कपाळाला गंध लावणारे, सनातन धर्माचे रक्षण करणारे पहिलेच मुख्यमंत्री पाहत आहोत" कुणी केलं फडणवीसाचं कौतुक?

भाविकांना गोदावरीच्या निर्मळ आणि प्रवाही पाण्यात स्नान करता यावे, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदावारीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक परिक्रमा मार्ग, रेल्वे स्थानकावरील सुविधा, घाटांची संख्या आणि लांबी वाढविणे, जुन्या मंदिरांचे संवर्धन, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांचे रुंदीकरण, ओझर विमानतळाचे विस्तारीकरण आदी विकास कामे सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

...तर पहिली शिवी महाजन खातील

फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्यासाठी आम्ही पहिल्यांदाच प्राधिकरणाची निर्मिती केली. त्यासाठी वेगळा कुंभमेळामंत्रीही दिला. सनातन धर्माचा हा उत्सव व्यवस्थित व्हावा, अशी यामागे आमची भूमिका आहे. कुंभमेळ्यात काही चूक झाली तर पहिली शिवी महाजन खातील, नंतर मला शिव्या खाव्या लागतील, असे मिश्किल विधान फडणवीस यांनी केले. त्यावर सूत्रसंचालक महंत दुर्गादास यांनी तत्काळ महंत आणि साधू आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी एकत्रित होणार आहेत, ते शिव्या देणार नाहीत, असे सांगत हजरबाबीपणाचा प्रत्यय दिला.

Girish Mahajan & Devendra Fadanvis
Baramati Bypoll : पोटनिवडणुकीवर पार्थ पवार पहिल्यांदाच बोलले अन् दिला करारा जवाब; म्हणाले, काय त्रास होईल, ते दिसेल...

साधूग्रामसाठी कायमस्वरुपी जागा घेणार

सरकारकडून साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक कुंभमेळ्याला शेतकऱ्यांकडून जागा भाडे तत्वावर घेतली जात होती आणि कुंभमेळा झाल्यानंतर त्यांना ती परत केली जात असे. परंतु यंदाच्या कुंभमेळ्यात सरकार साधुग्रामसाठी स्वत:ची जागा विकत घेणार आहे. जेणेकरुन प्रत्येक कुंभमेळ्याला ती वापरता येईल अशी माहिती फडणवीसांनी दिली. साधूग्राममध्ये आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com