Devendra Fadnavis : “कपाळाला गंध लावणारे, सनातन धर्माचे रक्षण करणारे पहिलेच मुख्यमंत्री पाहत आहोत" कुणी केलं फडणवीसाचं कौतुक?

Nashik Sant Sammelan : नाशिक मध्ये झालेल्या अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. फडणवीसांनी कार्यक्रमात साधू-महंतांचे आशीर्वाद घेतले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. यावेळी फडणवीस यांनी व्यासपीठावर येताच आधी सर्व साधू-महंतांना वाकून नमस्कार करीत त्यांचा आशीर्वाद घेतला. प्रत्येकाच्या जागेवर जात त्यांना फुलांचा हार घालून नमस्कार केला.

फडणवीस म्हणाले, सनातन धर्मात काही दांभिक लोकांचा शिरकाव झाला असून ते आपल्या धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मोजक्या लोकांमुळे आपला प्राचीन सनातन धर्म बदनाम होऊ देणार नाही, त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची माझी तयारी आहे. अशा लोकांना शोधले जाईल आणि कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, आम्हाला साधू- महतांचा आशीर्वाद लागणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Corruption Case : फडणवीसांकडील खात्यात 'ACB' ची धडक कारवाई, बडा अधिकारी अटक; मंत्री झिरवाळ प्रकरणानंतर पुन्हा खळबळ

कुंभमेळा हा राष्ट्रीय एकतेचे तसेच तो सनातन धर्माचे प्रतीक आहे. त्यामुळे साधू-महंत सांगतील, त्या दिशेने कार्य होईल. आम्ही त्यांच्या आज्ञेबाहेर नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. याच परिषदेत साधू-महतांनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांचे भरभरुन कौतुक केले. कपाळाला गंध लावणारे, सनातन धर्माचे रक्षण करणारे पहिलेच मुख्यमंत्री आम्ही पाहत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी साधूंनी दिली.

Devendra Fadnavis
Sunetra Pawar: सुनेत्रावहिनींनी अर्ज भरण्यापूर्वी एका बॅनरनं वेधलं लक्ष! तटकरे, पटेलांचा एकेरी उल्लेख, 'अजितदादांचे फक्त नावच...'

याच कार्यक्रमात धर्मस्वातंत्र्य विधेयक आणल्याबद्दल अखिल भारतीय संत समितीतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री दादा भुसे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिर येथे झाला.

Devendra Fadnavis
Corruption Case : फडणवीसांकडील खात्यात 'ACB' ची धडक कारवाई, बडा अधिकारी अटक; मंत्री झिरवाळ प्रकरणानंतर पुन्हा खळबळ

कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अखिल भारतीय संत समिती अध्यक्ष अविचल देवाचार्यजी, महंत श्री ग्यान देवसिंग महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी महाराज, संत निवृत्ती महाराज, रावसाहेब महाराज गोसावी, पुरुषोत्तम महाराज देहूकर, अशोक तिवारी, श्री यतिंद्रानंद गिरीजी महाराज, जनार्दनहरी महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, जितेंद्रानंद स्वामी, ब्रह्मेशनंद महाराज, राजेंद्र दास, महंत दुर्गादास महाराज, भक्तिचरणदास महाराज आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com