Bajrang Dal, Ekanth Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Ekanth Shinde : निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'न भूतो न भविष्यती.... '

Maharashtra Vidhan Sabha nivadnuk nikal LIVE : विधानसभा निवडणुकीच्या कलामध्ये महायुतीने 200 चा आकडा ओलंडला आहे. त्यानंतर महायुतीकडून राज्यात जल्लोष करण्यात येत असतानाच महायुतीच्या यशाबद्दल एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. कलामध्ये महायुतीने 200 चा आकडा ओलंडला आहे तर दुसरीकडे भाजपने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यानंतर महायुतीकडून राज्यात जल्लोष करण्यात येत असतानाच महायुतीच्या यशाबद्दल एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त जनतेचे आभार मानले आहेत. तर शिवसेनेच्या (Shivsena) विजयी उमेदवारांना वर्षा निवासस्थानावर येण्याचा निरोप त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

राज्यातील जनतेसाठी आमच्या सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या. त्याची अंमलबजावणी केली. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा या निवडणुकीत झाला आहे. राज्यातील जनतेने आमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले आहे. त्यासोबतच राज्यातील जनतेने 'न भूतो न भविष्यतो' यश दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath shinde ) राज्यातील जनतेचे आभार मानले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. कलामध्ये महायुतीने २०० चा आकडा ओलंडला आहे तर दुसरीकडे भाजपने १२५ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ ६० जागांवर आघाडी दिसत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार हे दिसत असताना आमदार प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 'देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील', असे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT