Solapur Assembly Election Result : सोलापुरात पहिल्या काही फेऱ्यांत हे उमेदवार आघाडीवर....

Solapur Vidhan Sabha Election 2024 Resultसोलापूर जिल्ह्यात सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोला आणि माढा वगळता इतर सात मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत झाली आहे. या मतदारसंघात मोठी चुरस दिसून येत आहे.
Solapur Assembly Counting
Solapur Assembly Counting Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 November : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (ता. 23 नोव्हेंबर) सकाळी आठपासून सुरुवात झाली असून सध्या पहिल्या काही फेरीतील मतांची मोजणी करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातील पोस्टल मतांसह पहिल्या टप्प्यातील काही आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यात विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, उत्तम जानकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजित शिंदे, देवेंद्र कोठे हे आघाडीवर आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोला आणि माढा वगळता इतर सात मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत झाली आहे. या मतदारसंघात मोठी चुरस दिसून येत आहे. सोलापूर दक्षिण आणि पंढरपुरात आघाडीत बिघाडी झाली आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

पंढरपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार उतरवले आहेत. सोलापूर दक्षिणमध्ये मात्र धर्मराज काडादी हे अपक्ष निवडणुकीच्या रिंंगणात उतरल्याने चुरस निर्माण झालेली आहे. काडादी यांनी महायुतीमधील भाजपचे सुभाष देशमुख आणि महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अमर पाटील यांच्या पुढे आव्हान निर्माण केलेले आहे.

Solapur Assembly Counting
Kothrud Election Result 2024 : महायुतीला 160 जागा मिळणार पण मुख्यमंत्री..., मतमोजणीला सुरूवात होताच चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

सोलापूर जिल्ह्यातील आघाडीवर असलेले मतदारसंघनिहाय उमेवार

सोलापूर शहर उत्तर : विजयकुमार देशमुख हे १२ हजार मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)

सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख हे साडेसहा हजार मतांनी आघाडीवर

अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी साडेदहा हजार मतांनी आघाडीवर

सोलापूर शहर मध्य : देवेंद्र कोठे दोन हजार मतांनी आघाडीवर

पंढरपूर : भगीरथ भालके ६८०० हजार मतांनी आघाडीवर

मोहोळ : यशवंत माने २८५६ मतांनी आघाडीवर (तिसरी फेरी)

सांगोला : डॉ. बाबासाहेब देशमुख २६०९ मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी)

बार्शी : राजेंद्र राऊत १२०० मतांनी आघाडीवर

माळशिरस : उत्तम जानकर ९०० मतांनी आघाडीवर (दुसरी फेरी)

माढा : अभिजीत पाटील हे ७०० मतांनी आघाडीवर (तिसरी फेरी)

करमाळा : नारायण पाटील हे ९१३ मतांनी आघाडीवर (तिसरी फेरी)

Solapur Assembly Counting
Maharashtra Election Results 2024 LIVE Counting : पुण्यात महायुतीचा बोलबाला; कुठल्या जागेवर कोण पुढे...

सोलापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संमिश्र आघाडी मिळताना दिसत आहे. काही ठिकाणी अपक्षही पुढे आहेत. काही मतदारसंघात धक्कादायक निकालाची शक्यता दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com