EVM  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Voting Today 20 November 2024 : EVM बंद ; मालेगाव, नागपूर, नाशिक, कोथरुड, जामनेरमध्ये मतदारांचा खोळंबा

EVM Machine Down voters waiting: राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात 4134 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. सांयकाळी सहा वाजता मतदान बंद होणार आहे. शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

Mangesh Mahale

Maharashtra News: राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदानात उत्साहात सुरवात झाली आहे, पण काही ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद बदल्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या आहेत, रांगेत उभे राहिलेले मतदार त्रस्त झाले आहेत.

नागूपर, संभाजीनगर, मालेगाव, नाशिक येथे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला आहे. निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात 4134 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. सांयकाळी सहा वाजता मतदान बंद होणार आहे. शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक 292 या ठिकाणी असलेले ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार हे ताटकळत असल्याचे दिसत आहेत. अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे.

नाशिक येथे पंचवटी परिसरातील सोनुबाई केला मतदान केंद्रावरील 189 बूथवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे नाशिकमधील मतदानाला 20 ते 25 मिनिटे उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक 292 मधील ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार हे अर्धा तास ताटकळले.

ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याने जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला 15 ते 20 मिनिटे विलंब झाला. हे ईव्हीएम मशीन सुरु व्हावे यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी मशीन सुरु झाल्यावर त्याला सील करण्यात आले. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कस्तुरबा नगर परिसरात विनयालय शाळेमधील मतदान केंद्रावर सकाळीच ईव्हीएम बंद पडले आहे. 18 मतदारांचा मतदान झाल्यानंतर ईव्हीएम बंद पडली सध्या काही मतदार त्या ठिकाणी ईव्हीएम दुरुस्त होऊन मतदान प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत थांबले आहेत. ईव्हीएम बंद पडल्यानंतर ही अद्याप मतदान प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मतदारांनी व्यक्त केला संताप

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आण्णासाहेब पाटील मतदान केंद्रावर सकाळी मतदान सुरू करण्यापूर्वी तांत्रिक अडचण आल्याने मतदान प्रक्रिया सुरू करण्यास चाळीस मिनिटे उशीर झाला. या ठिकाणी मतदानासाठी सकाळी साडेसहा वाजल्यापासून मतदार आले होते. मतदान प्रक्रिया वेळेत सुरू न झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. कामाला जाणारे मतदार मतदान न करताच परतले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक संपर्क अधिकारी सुनिल तायडे यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता ते म्हणाले, “ तांत्रिक कारणांमुळे मतदान प्रक्रिया सुरू करण्यास चाळीस मिनिटे उशीर झाला. तांत्रिक अडचण लक्षात येताच वरिष्ठांनी ती अडचण दूर करून मतदान प्रक्रिया सुरू केली आहे. समजा सायंकाळी उशीरापर्यंत मतदार रांगेत उभे असतील तर त्यांना टोकण देऊन मतदान करून घेता येईल.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT