Impact on Upcoming Zilla Parishad and Panchayat Samiti Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी विरोधक मतदारयाद्यांमधील कथित घोळावरून आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांतील सर्व प्रमुख नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. पण या मोर्चाआधीच राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा व गोंदिया हे जिल्हे वगळून उर्वरित सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. आयोगाने यापूर्वी 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वजनिक निवडणुकीसाठीच्या मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्याची मुदत 27 ऑक्टोबर ही होती. पण आता त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे दुबार मतदारांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील दुबार नावांबाबत करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सूचना निर्गमित करण्यात येत असून त्यानुसार दुबार नावाबाबत आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी, असे राज्य आयोगाचे उप सचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या पत्रात म्हटले आहे.
आयोगाच्या या आदेशामुळे 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या मतदारयाद्या प्रसिध्द करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. पत्रानुसार, निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याची अंतिम मुदत 3 नोव्हेंबर ही असेल. तसेच या मतदारयाद्या माहिती ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीखही 3 नोव्हेंबर ही असेल. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केली जाईल.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मतदानयाद्यांमधील अनेक त्रुटी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दुबार नावांचा मुद्दाही प्रकर्षाने मांडण्यात आला होता. आता आयोगाने दुबार नावांबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विरोधकांच्या मोर्चाआधीच आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांबाबत हा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.