

BJP’s Strategic Edge in Jammu & Kashmir Politics : जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागांवरील निवडणुकीचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. हा निकाल नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडिया आघाडीसाठी झटका असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौथ्या जागेवरील कॉन्फरन्सचे उमेदवार इमरान नबी डार यांचा सात मतांनी पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार सतीश वर्मा यांना मताधिक्यापेक्षा चार मते अधिक मिळाली. तब्बल 14 वर्षांनंतर भाजपने कॉन्फरन्सचा बदला घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने चार तर भाजपने तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते. पहिल्या तीन जागा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाने आरामात जिंकल्या. तेवढे पुरेसे संख्याबळ त्यांच्याजवळ होते. तर चौथ्या जागेसाठीही त्यांनी मजबूत फिल्डींग लावली होती. काँग्रेस, पीडीपी व अपक्ष आमदार त्यांच्यासोबत होते. त्यामुळे विजयासाठीचा 29 च्या आकड्याचे गणित जुळत होते. पण प्रत्यक्ष निकालात भाजपने इतिहासाची पुनर्रावृत्ती केली.
भाजपने 14 वर्षांपूर्वीच्या राजकीय कुरघोडीचा बदला घेतल्याची चर्चा सुरू आहे. भाजपकडे केवळ 28 आमदार होते. त्यानंतरही त्यांनी वेगवेगळ्या नोटिफिकेशननुसार तीन जागांसाठी तीन उमेदवार दिले होते. चौथ्या जागेसाठी प्रामुख्याने चुरस होती. त्यासाठी भाजपकडे एक आमदार कमी होता. पण प्रत्यक्ष निकालात शर्मा यांना 32 मते मिळाली. संख्याबळापेक्षा चार मते अधिक मिळाली आहेत.
2011 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या 11 आमदारांपैकी सात आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराला मतदान केले होते. यावेळीही म्हणजे राज्यसभा निवडणुकीत सात मतांनीच एनसीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने सातचा फेरा पूर्ण झाल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. एनसीच्या उमेदवाराला प्रत्यक्षात 25 मते मिळाली होती. पण तीन मते बाद ठरविण्यात आली. चुकीच्या क्रमांकामुळे ही मते अवैध ठरली. तर चार आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले.
भाजपला मिळालेली अतिरिक्त चार मते कोणती, यावरून आता इंडिया आघाडीमध्ये वाद सुरू झाला आहे. अब्दुल्ला यांनी हा धोका असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसने अपक्ष आमदारांचा पाठिंबा असूनही एनसीला आवश्यक मते जमविता आली नाही, यात आम्ही काय करू शकतो, असे म्हणत हात वर केले आहेत. तर आपच्या आमदाराने आपले मत वाया गेल्याची नाराजी व्यक्त केली. एनसीला बसलेला क्रॉस वोटिंगचा फटका सरकारमधील अंतर्गत वादावर आमदारांची प्रतिक्रिया असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.