exit polls sarkarnama
महाराष्ट्र

Zilla Parishad elections exit poll: जिल्हा परिषदेतही भाजपचाच डंका : एक्झिट पोलमध्ये नंबर वन पक्षाचा अंदाज; सविस्तर आकडे काय?

Maharashtra voting News: मतदानप्रक्रिया पार पडताच आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा महायुतीचे वर्चस्व दिसत आहे. तर काही ठिकाणी जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था असणार आहे. एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतात ते पाहू.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी शनिवारी सकाळपासूनच उत्साहात मतदान पार पडले. काही ठिकाणी घडलेले किरकोळ अनुचित प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदानासाठी काही ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रचार काळात सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. मतदानप्रक्रिया पार पडताच आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा महायुतीचे वर्चस्व दिसत आहे. तर काही ठिकाणी जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था असणार आहे. एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतात ते पाहू.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान झाले.

त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदेत एकूण 731 गट होते. त्यापैकी सर्वाधिक 263 गटामध्ये भाजपचे (BJP) उमेदवार विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर त्याखालोखाल 156 गटात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील तर 118 गटात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज एक्झिट पोलने अंदाज वर्तवला आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला 61 गटातील उमेदवार विजयी होऊ शकतात तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे 48 गटातील उमेदवार विजयी होतील तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 गटातील उमेदवार विजयी होती असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 37 गटात इतर व अपक्ष उमेदवार विजयी होतील तर सहा गटात मनसेचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या आकडेवारीनुसार राज्यातील 12 पैकी जवळपास 6 जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते तर तीन ठिकाणी महायुतीच्या मित्र पक्षाची एकत्रित सत्ता येऊ शकते. तर दोन ठिकाणी स्थानिक आघाडीचे वर्चस्व राहणार आहे तर एक ठिकाणी त्रिशंकू अवस्था राहणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. मतमोजणी सोमवारी होणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT