

Maharashtra Congress Politics: महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक महापालिकांवर सत्ता स्थापन केली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वादात काँग्रेसच्या हातून महापौर पद जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोघांमध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न केले. मात्र, वडेट्टीवार यांनी आपला स्वतंत्र गट नोंदवण्याचा प्रयत्न केला.
वडेट्टीवार हे माघार घेत नसल्याने शेवटी केंद्रामधून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली सुरू केल्या. वडेट्टीवार यांच्या गटाला महापौर पद मिळणार नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले. वडेट्टीवार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यानंतर नेमके काय कारण याची उत्सुकता होता. मात्र, सर्व चर्चांना पूर्ण विराम देत उपमहापौर पदासाठी आपल्या गटातील वसंत देशमुख यांचे नाव पुढे केले आहे.
वसंत देशमुख उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, धानोरकर गटाकडे महापौर पद राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन केली जाणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समितीची अध्यक्ष देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार गटाला अडीच-अडीच वर्षे महापौर पद, स्थायी समिती मित्र पक्षाला देण्याचे ठरवण्यात आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.