Pratap Sarnaik announcement Sarkarnama
महाराष्ट्र

ST Mahamandal Recruitment: ...तर सुशिक्षित बेरोजगारांनो लागा तयारीला; एसटी महामंडळात तब्बल 17 हजार 742 पदांची मेगा भरती

Minister Pratap Sarnaik MSRTC Bharti 2026 News : मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत एसटी महामंडळाच्या मेगाभरतीबाबत घोषणा केली. या नव्या घोषणेमुळे राज्यात एसटी सेवेत काम करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्षानुवर्षे तोट्यात होतं. मात्र,राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली गेल्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात ओढा वाढला आहे. यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात लवकरच मेगाभरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी(ता.12) एसटी महामंडळ लवकरच 17 हजार 742 पदांची मेगा भरती करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच याबाबत अधिकची माहिती देताना सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळ दरवर्षी पाच हजार नव्या बसची खरेदी करण्याचे धोरण राबवत असून याच पार्श्वभूमीवर अधिकचं मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्याचमुळे ही नवी मेगाभरती कंत्राटी पद्धतीनं केली जाणार आहे, असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत एसटी महामंडळाच्या मेगाभरतीबाबत घोषणा केली. या नव्या घोषणेमुळे राज्यात एसटी सेवेत काम करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

त्यात परिवहन मंत्र्यांनी मेगाभरतीची घोषणा करतानाच 2022 च्या दीर्घकाळ चाललेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाच्या कालावधीत ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपली सेवा पूर्ण केली.त्या सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांना या भरती प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून या कर्मचार्‍यांना राज्य सरकारच्या सेवेत सहभागी करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.

एसटी बस नेहमीच सर्वसामान्य प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा राहिली आहे. त्यात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना दिली जात असलेल्या तिकीट दरातील सवलतींमुळे एसटीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे. याच धर्तीवर एसटी महामंडळाकडून बसेसच्या ताफ्यात मोठी वाढ केली जात आहे.

एसटी महामंडळाच्या सध्या सुमारे 14000 हून अधिक बसेस आहेत. तसेच सरकारनं एसटी महामंडळासाठी दरवर्षी नव्या 5000 बसेस खरेदी करण्याचं धोरण ठरवलं आहे. यात 8000 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 3000 बसेस टप्प्याटप्प्यानं एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

​या सगळ्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुखकर आणि दर्जेदार सेवेसाठी मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाकडून राज्याच्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर लवकरच भरती प्रक्रियेबाबत अधिकृत कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT