Mahavikas Aaghadi Sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्रिपदाबाबत ठाकरेंचं मोठं विधान; पवार, पटोलेंचीही जागेवरच सहमती

Sharad Pawar Uddhav Thackeray Nana Patole Mahayuti : गद्दारांचा पंचनामा या पुस्तिकेचे प्रकाशन आज महाविकास आघाडीकडून करण्यात आले. तसेच याबाबतचा एक व्हिडिओही रिलिज करण्यात आला आहे.

Rajanand More

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, ही भूमिका उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने मांडली जात आहे. पण शरद पवार आणि नाना पटोलेंकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, रविवारी पहिल्यांदाच पवारांसह पटोलेही ठाकरेंच्या मताशी सहमत संकेत दिले.

महायुती सरकारच्या कारभारावर 'गद्दारांचा पंचनामा' ही पुस्तिका आणि चित्रफीत महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना UBT चे प्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ठाकरेंनी महायुतीकडे बोट दाखवले. महायुतीने त्यांचा चेहरा जाहीर केला की आम्ही करू, असे ते म्हणाले. भाजपची एवढी दयनीय असवस्था झाली आहे की चोर आणि गद्दारांचे नेतृत्व मानावे लागत आहे. महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू द्या, नंतर आम्ही करतो. आणच्याकडे खूप चेहरे आहेत, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

ठाकरेंच्या या विधानानंतर शरद पवार यांनीही ठाकरे जे बोलले ते आपलेही म्हणणे असल्याचे सांगितले. तर आमचे एकमत आहे, असे म्हणत नाना पटोलेंनी या मुद्दावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. एकमताने मुख्यमंत्री कोण हे ठरवू. आम्हाला महाराष्ट्र वाचवायचा आहे. त्यासाठी आमची लढाई आहे. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्वाची नाही, असे पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT