Haryana Assembly Election : हरियाणा निवडणुकीचा भाजपचा खर्च एकनाथ शिंदेंनी केला; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

Sanjay Raut's Secret Blast : इतर राज्यातील निवडणुकीचा खर्चही मुख्यमंत्र्यांवर टाकण्यात आल्याने महाराष्ट्रात नुसती लूटच लूट सुरू आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 13 October : प्रत्येकाला निवडणुकीत वारेमाप पैसा हवा आहे. इतर राज्यांतील भाजपच्या निवडणुकीचा खर्च महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करायचा आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा भाजपचा खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. तो खर्च किती हजार कोटी असेल, याचा विचार करा. इतर राज्यातील निवडणुकीचा खर्चही मुख्यमंत्र्यांवर टाकण्यात आल्याने महाराष्ट्रात नुसती लूटच लूट सुरू आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत (Sanjay Raut) हे माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर गंभीर आरोप करत काही गौप्यस्फोटही केले. ते म्हणाले, सरकारमधील सर्व लोक खा खा खाणारे आहेत. पण, इतकं खादाड सरकार आम्ही कधी पाहिलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० टक्के, अजित पवार ४० टक्के, देवेंद्र फडणवीस ५० टक्के असे कमिशन घेतात. पण, राज्याला काय मिळतं. या कमिशनबाजीमुळेच या तिघांचं एकमेकांमध्ये पटत नाही.

महायुतीमधील तीन पक्षांमध्ये पहिल्या दिवसांपासून मारामाऱ्या सुरू आहेत. तीन पक्षाचे सरकार एकमेकांचे छताडावर बसलेले आहेत. अमित शहांना महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमजोर करायचे आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, असा आरोपही राऊतांनी केला.

Eknath Shinde
Baba Siddique : सिद्दीकींच्या हत्येनंतर राऊत संतापले; ‘फडणवीसांची गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी करा’

देवेंद्र फडणवीसांना कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताबा घेतला आहे. पूर्वी काँग्रेसचे नेते एस. के. पाटील दिल्लीला सर्वाधिक पैसे द्यायचे. त्या सर्वांचा रेकॉर्ड सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोडला आहे. अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडल्याचे दिसते आहे. पण, हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू शकतं, असा टोमणाही संजय राऊतांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यावरूनही संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट केले. ते म्हणाले, ते सुरतला पळाले, सुरतेवरून गुवाहाटीला आणि गुवाहाटीवरून गोव्याला पळाले आणि पोलिस बंदोबस्तात ते मुंबईत आले. त्यांना सध्या अमित शहा आणि मोदी हंटर घेऊन पळवत आहेत. तुम्ही पळत आहात, तुमचा चोर पोलिस गेम चालू आहे. मुख्यमंत्री काय आम्हाला पळवणार. येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्र त्यांना महाराष्ट्र पळवेल.

Eknath Shinde
Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावरून राहुल गांधींनी महायुती सरकारला फटकारलं; म्हणाले, "महाराष्ट्रातील..."

बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू ही घटना आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. कधी काळी बाबा सिद्दिकी आमचे सहकारी होते. त्यांची हत्या झालेली आहे. अशावेळी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषद व इतर सगळ्या गोष्टींचा विचार न करता या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत आम्हाला एकत्र बसून चिंता आणि चिंतन करावे लागेल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com