Vidhan Bhavan Sarkarnama
महाराष्ट्र

cabinet expansion : महायुती सरकारमध्ये मोठी खांदेपालट; भाजपमधील 3, शिवसेना 3, राष्ट्रवादीच्या 5 मंत्र्यांचा पत्ता कट

cabinet expansion news : महायुतीमधील भाजपकडून मंत्रीपदासाठी 19 जणांना फोन करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून 10 जणांना संधी देण्यात आली आहे.

Sachin Waghmare

Nagpur News : महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी रविवारी होत आहे. त्यामुळे सकाळपासून संभाव्य मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोन केले जात आहेत. या यादीमध्ये अनेक मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. तब्बल 19 नवे चेहरे सरकारमध्ये असणार आहेत. त्यामुळे मोठी खांदेपालट महायुती सरकारमध्ये करण्यात आली आहे. भाजपमधील 3, शिवसेना 3, राष्ट्रवादीच्या 5 अशा एकूण 11 मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. (cabinet expansion News )

महायुतीमधील भाजपकडून (BJP) मंत्रीपदासाठी 19 जणांना फोन करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून 10 जणांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 11 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. या यादीमध्ये अनेक मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे.

या यादीनुसार तब्बल 19 चेहरे सरकारमध्ये असणार आहेत. त्यामुळे मोठी खांदेपालट महायुती सरकारमध्ये करण्यात आली आहे. भाजपने जवळपास 12 नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने तब्बल चार नव्या चेहऱ्याना तर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

'या' मंत्र्यांचा पत्ता कट

फडणवीस सरकारमध्ये मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. भाजपमधील सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित या तीन मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तर शिवसेना शिंदे गटातील तानाजी सावंत, दीपक केसरकर व अब्दुल सत्तार यांना वगळण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून धर्मरावबाबा आत्राम, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे अशा पाच मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT