Mahayuti Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीची धडधड वाढली; शिंदे गटाच्या जवळच्या पक्षाने मागितल्या विधानसभेच्या 33 जागा

Political News : महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यानंतर महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या छोट्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात जागेवर दावा केला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. दुसरीकडे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात असताना महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यानंतर महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या छोट्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात जागेवर दावा केला आहे.

महायुतीमध्ये भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (Ncp) यांच्यासोबतच आणखी काही छोटे घटक पक्ष आहेत. त्यामध्ये रामदास आठवलेंचा रिपाई, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाने (कवाडे गट), विनय कोरेंचा जनसुराज्य पक्षानेही जागांवर दावा केला आहे.

विधानसभेसाठी आम्हाला 33 जागा द्या व आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत एक जागा द्या, असे म्हणत नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेसाठी एक उमेदवारही पीपल्स रिपब्लिक पार्टीने जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Mahayuti News)

पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नांदेडमधील देगलूर मतदारसंघातून बापूराव गजभारे यांच्या नावाची घोषणा माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

महायुतीकडे जोगेंद्र कवाडे यांनी आगामी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला एका जागेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतही एका जागा मिळावी. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाला 33 जागा मिळाव्यात, असा आग्रह धरला आहे.

येत्या काळात पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर ते आमची मागणी मान्य करतील. विधानसभेसाठी आमची 33 जागांची मागणी आहे. पण किमान पाच जागा तरी मिळतील अशी अपेक्षा जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली आहे.

महायुतीमध्ये चुरस

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन प्रमुख पक्ष किती जागा लढेल, याचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी तीनही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात जागावाटपावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

जनसुराज्य शक्ती पक्षाचा 15 जागावर दावा

महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांन 15 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा-शाहूवाडी, चंदगड आणि करवीर या जागा विनय कोरे यांनी महायुतीकडे मागितल्या आहेत. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील एकूण 15 जागांची मागणी विनय कोरे यांनी केली आहे. त्यानंतर आता जोगेंद्र कवाडेंनीही 33 जागा मागितल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT