Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti : 3 मंत्री घेणार महायुतीचा निर्णय; भांडण सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी शोधला उपाय

Maharashtra ministers district charge News : महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक जिल्ह्यातील तीन पक्षाच्या मंत्र्यांची समन्वय समिती नेमण्यात येणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती बळकट राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक जिल्ह्यातील तीन पक्षाच्या मंत्र्यांची समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. ही समन्वय समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सर्वच निर्णय घेणार आहे. त्यामुळे येत्या काळात स्वबळाच्या घोषणांना चाप बसणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती टिकवण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांची समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. यामध्ये भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक एक मंत्री मिळून तीन मंत्र्याची समन्वय समिती असणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय यामध्ये एक भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार आहेत.

येत्या काळात होत असलेल्या स्थानिकच्या निवडणुकीत महायुती टिकवण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर असणार आहे. त्यामुळे येत्या काळात शक्यतो महायुतीच व्हायला हवी, अशी भूमिका घेत तीन पक्षाच्या समन्वय समितीने बैठकीत एक रणनीती निश्चित केली आहे. त्यानुसार स्थानिक पालकमंत्री आणि अन्य दोन पक्षांचे संपर्क मंत्री अशा तिघांची समिती प्रत्येक जिल्ह्यात महायुतीने एकत्रितपणे लढावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.

त्यासोबतच येत्या काळात महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्षांमध्ये कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. महायुती म्हणून एकत्रित काम करीत असताना एकमेकांवर टीका टिपण्णी टाळण्याचे आवाहनही महायुतीमधील तीन पक्षांच्या नेत्यांना करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील एका पक्षाचा नेता स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करतो. त्यामुळे त्याठिकाणचे वातावरण खराब होत आहे. त्यासोबतच महायुतीमधील तीन पक्षात समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT