Manikrao Kokate Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा शनिवारी राजीनामा ? अजित पवार-सुनील तटकरे यांची महत्त्वाची बैठकीत होणार मोठा निर्णय

Ajit Pawar Sunil Tatkare Meeting Manikrao Kokate : अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या ताज्या वादग्रस्त वर्तनावर आणि पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. कोकाटे यांच्या ताज्या वादग्रस्त वर्तनावर आणि पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत कोकाटे यांच्या सहज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

याशिवाय, कोकाटे यांच्या वादग्रस्त कृत्याच्या निषेधार्थ लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत 'छावा' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, या आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या प्रकरणी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

घडत असलेल्या प्रकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यांचा पक्ष राजीनामा घेणार असल्याच्या यातील चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणारी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यातील बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

कोकाटेंच्याबाबत कठोर निर्णय होणार

या बैठकीत कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय, लातूरमधील मारहाण प्रकरणामुळे पक्षाची झालेली बदनामी, शेतकऱ्यांमधील नाराजी आणि महायुतीतील अस्वस्थता यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पक्षातील सूत्रांनुसार, कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधाने केल्याने अजित पवार यांनी त्यांना अनेकदा समज दिली होती. मात्र, या ताज्या प्रकरणाने पक्षाची प्रतिमा डागाळली असून, याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अजित पवार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT