Manoj Jarange Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे अखेर ठरले; 'या' 14 मतदारसंघात लढवणार निवडणूक तर 'या' ठिकाणी पाडण्याची रणनीती

Manoj Jarange Strategy for Maharashtra Election: मनोज जरांगे यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केले आहे. त्यासोबतच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कसून तयारी करत असतानाच मनोज जरांगे यांनी रविवारी मोठी घोषणा केली. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मनोज जरांगे यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केले आहे. त्यासोबतच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर कोणाला झटका देणार? याची चर्चा जोरात सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, कोणत्या उमेदवारांना पाडणार यासंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत. विशेष करून मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

अंतरवाली सराटीत रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. त्यामध्ये राज्यातील 14 मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर या ठिकाणी उमेदवार पाडण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत आणखी काही जागावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघाबाबतचा निर्णय अद्याप पेंडिंग असल्याने सोमवारी सकाळी सातपर्यंत उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे.

1. बीड - बीड विधानसभा लढवणार. गेवराई आणि आष्टीबाबतनंतर चर्चा करून निर्णय घेणार. केज (राखीव) बाबत स्थानिक मराठा जे निर्णय घेतली तो निर्णय घेणार. उर्वरित पाडणार

2. जालना - परतूर विधानसभा लढवणार. इतर ठिकाणी पाडणार

3. संभाजीनगर - फुलंब्री विधानसभा लढवणार. कन्नडबाबतनंतर निर्णय घेऊ

4. हिंगोली - हिंगोली विधानसभा लढवणार. कळमनुरी पाडणार.

5. परभणी - पाथरी विधानसभा लढवणार. गंगाखेड, जिंतूर पाडणार

6. नांदेड - हदगाव विधानसभा लढवणार

7. लातूर - निलंगा विधानसभा लढवणार की लातूर ग्रामीण यावर एकमत झाले नाही. औसा पाडायचा.

8. धाराशिव - १) धाराशिव - कळंब आणि २) भूम -परंडा हे दोन मतदारसंघ लढवणार. तुळजापूर निवडणूक लढवायची आहे पण निर्णय नाही.

9. पुणे - १) पर्वती आणि २) दौंड हे दोन विधानसभा लढवणार.

10. जळगाव - पाचोरा मतदारसंघ

11. सोलापूर - करमाळा मतदारसंघ. पंढरपूर आणि माढा पेंडींग.

12. नाशिक - नांदगाव मतदारसंघ

13. अहिल्यानगर/नगर - १) पाथर्डी- शेवगाव (श्रीगोंदा पाडायचा)

या ठिकाणी पाडण्याची रणनीती

1. मुंबईतील 23 मतदारसंघात पाडणार

2. सातारा जिल्ह्यात एकही उमेदवार नसेल. पाडण्याची भूमिका बजावणार

3. बुलढाणा जिल्ह्यात उमेदवार नाही. सर्व पाडायची भूमिका

मनोज जरांगे निवडणूक लढवणारे मतदारसंघ :

1. बीड - बीड विधानसभा

2. जालना - परतूर विधानसभा

3. संभाजीनगर - फुलंब्री विधानसभा

4. हिंगोली - हिंगोली विधानसभा

5. परभणी - पाथरी विधानसभा

6. नांदेड - हदगाव विधानसभा

7. लातूर - निलंगा / लातूर ग्रामीण विधानसभा यापैकी एक ठरणार

8. धाराशिव - १) धाराशिव - कळंब २) भूम -परंडा हे दोन मतदारसंघ.

9. पुणे - १) पर्वती आणि २) दौंड हे दोन विधानसभा.

10. जळगाव - पाचोरा मतदारसंघ

11. सोलापूर - करमाळा मतदारसंघ

12. अहिल्यानगर/नगर - पाथर्डी- शेवगाव विधानसभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT