Manoj Jarange Patil Manoj Jarange Patil
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil update : सिरीयस कंडिशन, सलाईन लावून प्रवास अशक्य! मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत खुद्द जिल्हा शल्य चिकित्सकांनीच दिली महत्वाची माहिती

Manoj Jarange health update, hunger strike, Manoj Jarange Mumbai march : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर; डिहायड्रेशन, यूरिन आऊटपूट थांबल्याने डॉक्टरांचा तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला.

Rajanand More

Manoj Jarange latest news : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. सध्या ते पाटोद्यातच असून तिथे खुद्द बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंके यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. तसेच जागेवरच उपचारही सुरू करण्यात आले आहेत. जरांगे यांची प्रकृती सिरीयस असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉ. सोळंके यांनी मीडियाशी बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली आहे. जरांगे यांची प्रकृती सिरीयस आहे. केवळ सलाईन लावून मुंबईला प्रवास करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांना अॅडमिट करण्याचीच गरज आहे. सकाळपासून यूरिन आऊटपूट नाही. प्रचंड डिहायड्रेशन आहे. ही गंभीर स्थिती आहे. सुरूवातीला त्यांचे डिहायड्रेशन कमी करणे गरजेचे आहे. प्रकृती आणखी खालवू नये म्हणून आम्ही त्यांना उपचाराची विनंती केली. त्यानुसार आम्ही आधी डिहाड्रेशन कमी करणार आहोत, इलेक्ट्रोलाईट बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ते मुंबईला जाणार की नाही, आंदोलन स्थगित करणार का, याबाबत अद्याप संभ्रम आहे. मुंबई पोलिसांनीही अद्याप त्यांना आंदोलनाची परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी त्यांना पत्र पाठवून आंदोलनाची संपूर्ण माहिती मागवली.

गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावे, त्यांनी मुंबईत येऊ नये, असे सत्ताधारी आमदार, मंत्र्‍यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना आवाहन करण्यात आले आहे. जरांगे यांच्या १२ पैकी ११ मागण्या मान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतरही जरांगे पाटील अजून तरी आपल्या आंदोलनावर ठाम दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT