Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश, केंद्राकडे धाव; तुमची कशी होतेय लूट? एकदा वाचाच...

Tukaram Mundhe hospital bills, medical consumables price : वैद्यकीय उपकरणांच्या किंमतींवर नियंत्रणाचा अभाव, छापील व व्यापार किंमतीत प्रचंड तफावत; तुकाराम मुंढेंनी केंद्र सरकार, NPPAकडे कठोर मार्गदर्शक तत्त्वांची मागणी केली.
Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश, केंद्राकडे धाव; तुमची कशी होतेय लूट? एकदा वाचाच...
Published on
Updated on

Hospital bill scams : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे अन्न भेसळीचे रॅकेट उद्ध्वस्त करत असतानाच आता त्यांनी रुग्णालयांमधील लुटीचाही पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्रात रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर वैद्यकीय वापरासाठीच्या वस्तूंच्या किंमतींबाबत केलेल्या सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच रुग्णालयांमधील बिलांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असल्याचे त्यांनी उघड केले आहे.

मुंढे यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी उपचारादरम्यान वैद्यकीय वापरासाठीच्या काही वस्तुंच्या किंमतींमधील तफावत सांगितली आहे. त्यांनी म्हटले आहे.

रुग्णालयाच्या बिलातील सर्वात महागडा खर्च रुग्णालयात दाखल होण्याआधीच एकप्रकारे निश्चित झालेला असतो. वैद्यकीय वापरातील वस्तुंच्या किंमतींसाठी प्रत्यक्ष उत्पादित खर्च आणि त्यावरील छापील किंमतीमधील तफावत जाणून घेण्याचा नागरिकांकडे कोणताही पर्याय नाही.

सलाईनच्या किंमतीत २,८४१ टक्के वाढ

मुंढे यांनी आयव्ही सेट म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत सलाईनच्या किंमतीचे उदाहरण दिले आहे. सर्व्हेमध्ये असे आढळून आले की, आयव्ही सेटवरील छापील किंमत ३२५ रुपये इतकी होती. मात्र, त्याची प्रत्यक्ष व्यापार किंमत केवळ ११.०५ रुपये एवढीच होती. म्हणजेच किंमतीत तब्बल २,८४१ टक्के वाढ होती.

Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश, केंद्राकडे धाव; तुमची कशी होतेय लूट? एकदा वाचाच...
BJP MP case : लोकसभेत काँग्रेसच्या ज्या नेत्याने केला पराभव, भाजप उमेदवाराचे त्यांच्याच लेकीशी लग्न; आता पत्नी खासदार, पण झाला घटस्फोट

सिरिंज, कॅथेटरच्या किंमतीतही मोठी तफावत आढळून आल्याची माहिती मुंढे यांनी दिली आहे. एका सिरिंजची व्यापार किंमत ६.७५ रुपये असताना त्यावरील छापील किंमत ५७.२० रुपये होती. तर कॅथेटरची छापील किंमत ३१० रुपये आणि व्यापार किंमत केवळ २९.४१ रुपये होती.

रुग्णांकडे नाही पर्याय

रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यानंतर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर उपचारासाठीच्या वस्तूंची किंमतीमध्ये तुलना करता येत नाही. त्यांच्याकडे पर्यायही नसतो. किंमतींबाबत प्रश्न विचारता येत नाहीत. छापील किंमतही अनेकदा उत्पादक आणि वितरकांच्या पातळीवरच निश्चित केली जाते. त्यांच्यापातळीवर किंमतीत मोठा तफावत ठेवली जात असल्याचे सर्व्हेमध्ये समोर आले आहे.

Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश, केंद्राकडे धाव; तुमची कशी होतेय लूट? एकदा वाचाच...
Sachin Pilot news : सचिन पायलट यांनी सुरू केली तटबंदी; एका फोटोतून दिला दिल्लीला स्पष्ट संदेश

किंमतीवर नियंत्रण नाही

वैद्यकीय उपकरणे किंवा वस्तूंमधील तफावतीमागे नियामक पातळीवर संरचनात्मक त्रुटी असल्याचे मुंढे यांनी म्हटले आहे. औषधे (किंमत नियंत्रण) नियम, २०१३ अंतर्गत असलेल्या औषधांच्या किमतींवरील मर्यादा निश्चित केली जाते. मात्र, अनेक वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय वापरातील वस्तूंवर असे नियंत्रण नाही. त्यामुळेच या वस्तूंच्या किमतींशी संबंधित माहिती नियंत्रणाबाहेर असते, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारकडे तक्रार

तुकाराम मुंढे यांनी सर्व्हेतील निष्कर्षाच्या आधारे याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. व्यापारी खरेदी किंमत (Trade Procurement Price) आणि छापील किंमत यांच्यात नियमानुसार किती तफावत असावी, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याची शिफारसही त्यांनी औषध विभाग आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथॉरिटी (NPPA) यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com