Eknath Shinde, Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation : मुंबई टप्प्यात येताच जरांगे-पाटलांचं मोठं विधान; '...तर सरकारसोबत चर्चेला तयार!'

Manoj Jarange Patil Morcha : याबाबत सरकारने मार्ग काढावा, असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Sachin Waghmare

Lonawala News : बंद दाराआड मी कुठलीही चर्चा केली नाही. काही अधिकारी मला भेटण्यासाठी आले होते. त्यांना सग्यासोयऱ्यांबाबतची माहिती देण्यासाठी भेटलो. त्यांच्याशी मी इतर कुठलीच चर्चा केली नाही.

राज्य सरकारचे मोठे शिष्टमंडळ आल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. ज्या ठिकाणी शिष्टमंडळ भेटेल त्या ठिकाणी चर्चा करण्याची तयारी आहे. चर्चेअंती तोडगा काढण्याची आमची तयारी असून याबाबत राज्य सरकारने योग्य तो मार्ग काढावा, असे मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांचे शिष्टमंडळ आले तर चर्चा करणार आहे. राज्य सरकारचे मोठे शिष्टमंडळ जेथे येईल, त्या ठिकाणी चर्चा करण्याची तयारी आहे. ऊन, वाऱ्यात आमचेही हाल होत आहेत. फक्त मुंबईकरांचे हाल होत नाहीत, तर इतरांचे हाल होत आहेत, मुंबईकर आणि आमचे हाल होऊ नयेत, ही मनापासून इच्छा आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.

शांततेत खूप ताकद असते

लढला तरी मराठा जिंकतो आणि शांत बसला तरी मराठाच जिंकतो. मराठाच जिंकतो हे सिद्ध करायचं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. शांततेत आंदोलन करून इतिहास घडवायचा आहे. सरकारने दडपण आणलं तरी शांत राहायचं. शांततेत खूप ताकद असते, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, यासाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानाकडं निघाले आहेत. पण आता हायकोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईला न येण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आझाद मैदानाऐवजी त्यांना नवा पर्यायही पोलिसांनी दिला आहे. 

R...

SCROLL FOR NEXT