Manoj Jarange : जरांगे मुंबईत पाऊल ठेवण्याआधीच सरकारचे शिष्टमंडळ लोणावळ्यात; आजच निर्णय होणार?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यांचा मोर्चा लोणावळ्यात पोहोचला असून उद्या मुंबईत पोहोचणार आहे. पण त्याआधीच जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झाले आहे. याबाबत जरांगे यांनीही मोठं विधान केले आहे.

जरांगे (Manoj Jarange) मुंबईत दाखल होण्याआधीच तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात शिष्टमंडळ पाठवले आहे. आजच त्यांच्यामध्ये चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरांगे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (Maratha Reservation)

Manoj Jarange
Manoj Jarange Maratha Morcha : जरांगेंमुळे एकवटलेल्या 'मराठा व्होट बँके'चा फटका निवडणुकीत कुणाला बसणार?

मीडियाशी बोलताना जरांगे म्हणाले, आम्ही चर्चेचे दार खुले ठेवले आहे. सरकारचे एक जुनं आणि एक नवं अशी दोन शिष्टमंडळं आली आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याआधी मी समाजाशी चर्चा करणार आहे. समाजाचे हित असेल तर बघू नाही तर चलो मुंबई. अजून शिष्टमंडळाला भेटलो नाही. आधी चर्चा मग पुढचे ठरवू.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही आरक्षणासाठी मुंबईला चाललो आहे. मग ते लोणावळ्यात (Lonavala) मिळो किंवा आझाद मैदानात. मागण्या मान्य झाल्या तर परत जाऊ, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिष्टमंडळाच्या माध्यमातून सरकार आज जरांगेंची मनधरणी कशी करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बुधवारी मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचे म्हटले होते. कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कायद्याच्या चौकटीत आणि कायम टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे जरांगे-पाटील व आंदोलनकर्त्यांनी सरकारचं ऐकलं पाहिजे आणि आंदोलन टाळलं पाहिजे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

R...

Manoj Jarange
Dharashiv lok sabha constituency : आमदारकीची हॅटट्रिक; आता विक्रम काळेंना खासदारकीचे वेध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com