Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब? महाराज लागले तयारीला

Satara Lok Sabha Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढणार? याविषयी तर्कवितर्क लढवले जात असले तरी...
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढणार? याविषयी तर्कवितर्क लढवले जात असले तरी छत्रपती उदयनराजे भोसले तयारीला लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून उदयनराजे भोसले यांनी कराड शहरात जनसंपर्क कार्यालयही सुरू केले आहे. या कार्यालयाच्या बोर्डावर भाजप नेत्यांचे फोटो असल्याने भाजपाने शिक्कामोर्तब केल्याचे विश्वासू कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे सांगत महाराजही तयारीला लागले आहेत.  Lok Sabha Election 2024

सातारा लोकसभा 'महायुती'कडून भाजप, शिवसेना (शिंदे गट), की राष्ट्रवादी (अजित पवार गट) निवडणूक लढविणार याबाबत अद्याप स्पष्टपणे कोणीही सांगत नाही. भाजपासह दोन्ही गट आम्हीच सातारा लोकसभा लढवू, असे छातीठोकपणे सांगत आहेत. शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव यांनी तयारीही सुरू केली आहे.

अजित पवार गटाकडून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील शिबिरात सातारच्या लोकसभा जागेवर दावा केला आहे. अशातच भाजपाही पहिल्यापासून सावध पवित्रा घेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्यात चर्चा होईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार सांगत आले आहेत. तरीही स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि नेते यांच्याकडून भाजपाची ताकद वाढली असल्याचे सांगत लोकसभा भाजप किंवा मोदींच्या विचाराचा उमेदवार लढेल, असे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje Bhosale
Loksabha Election 2024 : अजितदादा वाढवणार जयंत पाटलांचं टेन्शन; सांगलीत करणार शक्तिप्रदर्शन

कराडमध्ये जनसंपर्क कार्यालय 

'महायुती'त तिन्ही पक्षात उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरू असताना उदयनराजे भोसले यांनी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रश्नांवर तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कामावर लक्ष दिले जात आहे.

उदयनराजेंना गेल्या 2019 च्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघानी मताधिक्य कमी दिले होते. या तीन मतदारसंघांतील मतदारांची नाराजी महाराजांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरली होती. आता याच मतदारसंघातील प्रमुख ठिकाणी असलेल्या कराड शहरात बसस्थानकाच्या बाहेरील एका बिल्डिंगमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या कार्यालयाच्या बोर्डावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे फोटो आहेत. 

लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसलेंची पसंती

सातारा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाईल, हे राज्यपातळीपासून स्थानिक पातळीवर भाजपातील कोणीच नाव जाहीर करीत नव्हते. मात्र, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले हे नेहमीच लोकसभेला एकाच नावाला पसंती देत होते, ते म्हणजे उदयनराजे भोसले हे होय.

भाजपाकडून लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. तरीही डॉ. अतुल भोसले यांनी उदयनराजे भोसले हेच लोकसभेचे उमेदवार असतील, असे अनेकदा स्पष्ट केले होते. अखेर आता डॉ. अतुल भोसले यांच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातच खासदार उदयनराजे भोसले यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू झाले.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Udayanraje Bhosale
Lok Sabha Election 2024 : येडियुरप्पांचा काँग्रेसला दे धक्का! माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेआधी पुन्हा आणले भाजपमध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com