Manoj Jarange Patil Dhananjay Munde sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : '...अन्यथा करेक्ट कार्यक्रम करू', मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारसह धनंजय मुंडेंना इशारा

Manoj Jarange Patil : बीड सरपंच हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असून शनिवारी (ता.११) धाराशिव जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

Aslam Shanedivan

Dharashiv News : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धारशिवमधील आक्रोश मोर्चात शनिवारी (ता.11) उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मनोज जरांगे पाटील यांनी, मुंडे यांनी आता आपल्या गुंडांना थांबवावं अन्यथा गाठ आपल्याशी असल्याचा इशारा दिला आहे. तसेच फक्त २५ जानेवारी होऊन जाऊंदे मग सगळी मस्ती उतरवू, असेही संकेत मुंडे यांना थेट दिले आहेत.

यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना मनोज जरांगे पाटील यांनी, तुमची टोळी आता थांबवा. ही धमकी नसून फक्त आम्ही तुम्हाला सावध करत असल्याचे म्हटले आहे. तसेच यापुढे तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला तर आम्ही बंदोबस्त करू. तुमच्या लोकांचे पाप झाकण्यासाठी पांघरून घेऊ नका, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे जाहीर भाषणात म्हणाले, जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे. संतोष देशमुख यांचे घर आज उन्हात आले आहे. यांच्या कुटुंबाला न्याय देऊ पर्यंत मागे हटायचे नाही. आपल्या दुखण्यापेक्षा देशमुख कुटुंबाच्या वेदना अधिक असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील अरोपींवर मकोका लावण्यात आला. पण खंडणीतल्या आरोपींना मोकळे सोडण्यात आल्यावरून जरांगे यांनी हल्लाबोल करताना सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींनी मकोका लावा. तसेच यातून जर एखादा जरी आपोरी सुटला त्याचक्षणी महाराष्ट्र बंद करू असा इशारा त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन असून त्यांनी कुटुंबाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न्याय द्या. सगळ्या आरोपींना मोकाका लावा, त्यांच्यावर 302 लावा. जर न्याय दिला नाही, दगाफटाक केला तर आम्ही सरकारचा कार्यक्रम करू. मुख्यमंत्री यांनी दगाफटका दिला तर आम्ही खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असेही मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी जरांगे-पाटील यांनी बीडमध्ये जे काही ते आता सहन करण्यासारखे नसून सरकार आणि सरकारमधील आमदारांनी जागे व्हावे. अन्यथा महागात पडेल असेही म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी धाराशिवमधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या चिमुकलीवर जर अत्याचार होत असेल तर मुख्यमंत्री तुम्ही झोपला आहात काय? असा सवाल केला आहे. तसेच जर एका 3 वर्षाच्या मुलीवर जर असा अत्याचार होत असेल तर आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुमच्यावर थू करतोय. आधी ज्याने हा अत्याचार केला त्याला आणि त्याच्या आई-बापाला अटक करा, अन्यथा आपण धाराशीवमध्ये उतरू, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

जरांगे-पाटील यांनी हातात फोटो घेऊन मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना आरोपी अद्याप फरार असल्याचा दावा केला आहे. यांच्या आशीर्वादाने यांचे बगलबच्चे असे अपराध करत असल्याचा आरोप केला आहे. असेच प्रकरण केजमध्ये झाले असून येथे एका मुलीला मारून टाकले. याच्यामागे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. धनंजय मुंडे हे प्रकरण कोणत्या दिशेने नेत आहात असा सवाल केला आहे.

आजपर्यंत धनंजय मुंडे यांचे कधीच नाव घेतले नाही. आज त्यांचे नाव घेण्याचे कारण म्हणजे याप्रकरणात त्यांनी धनंजय देशमुख यांना धमकी दिली. आता 25 तारखेपर्यंत धीर धरा. एकदा आरक्षणाचे उपोषण सुरू होऊ दे एकदा आरक्षण मिळू दे. परळीपासून सगळचं बाहेर काढतो असेही जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन करताना, धीड व्हा, समाजाचे रक्षण करा, आता प्रत्युत्तर दिल्या शिवाय शांत राहायचे नाही, असा संदेश दिला आहे. तर संतोष देशमुख कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नाही. न्याय मिळवण्यासाठी देशमुख कुटुंबाला धीट व्हाव लागणार असून समाज तुमच्याकडे बघुन पुढे वाटचाल करत असून मागे हटू नका, असे म्हटले आहे.

वेळ प्रत्येकावर येत असते. आता तरी त्या गुंडाला थांबवं असा हल्लाबोल जरांगे-पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. तर मराठ्यांवर ओबींसींना सोडू नका अन्यथा आम्ही देखील प्रतिमोर्चे काढू. मस्तित राहू नका, अन्यथा आम्ही ती मस्ती उतरवू, असे म्हटले आहे. तर फक्त मुख्यमंत्री यांनी फक्त शब्द दिला असून मराठा समाज गप्प आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळवा. सर्व आरोपींना 302 लावा. त्यांना मकोका लावा असे आवाहन करताना, कोणाला मी जातीवादी आहे असे वाटू द्या पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT