Manoj Jarange Patil : संतोष देशमुख हत्येवरुन आक्रमक झालेल्या जरांगे पाटील यांच्याविरोधात 24 तासांत चार गुन्हे

Santosh Deshmukh murder Case : बीड जिल्ह्यातील परळीतील शिवाजीनगर, परभणी, धारूर व अंबेजोगाई या पोलिस स्टेशनमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी बीड, परभणी व पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या मोर्चावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जरांगे पाटील यांच्याविरोधात चार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील परळीतील शिवाजीनगर, परभणी, अंबेजोगाई व धारूर या पोलिस स्टेशनमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीतील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंडेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. मनोज जरांगे पाटील हे जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे रविवारी धनंजय मुंडे समर्थकांनी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले.

Manoj Jarange Patil
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात भिवंडी कनेक्शन; सीआयडी व तपास पथकांकडून दोघांकडे चौकशी

मुंडे समर्थक हे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते. या ठिय्या आंदोलनात त्यांच्याबरोबर महिला देखील सामील झाल्या. अखेर पहाटे 3 वाजता धनंजय मुंडेंविरोधात परभणीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगेंवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil
Beed Santosh Deshmukh Case : जरांगेना बेड्या ठोका, धसांचा राजीनामा घ्या; ओबीसी नेते आक्रमक

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर जर देशमुख कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यामुळे जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil
Santosh Deshmukh march : ना युती, ना आघाडी पुण्यातील सर्वच आमदार, खासदारांनी संतोष देशमुख यांच्यासाठी काढलेल्या मोर्चाकडे फिरवली पाठ

दरम्यान, याच प्रकरणात अंबेजोगाई पोलिस स्टेशनमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धारूर पोलिस स्टेशनमध्ये चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग 24 तासामध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात चार गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.

बीडमधील घटनेनंतर राज्यपातळीवरील नेते आरोपींना कठोरातील कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी करत असतानाच लक्ष्मण हाके, सदावर्ते यांनी मात्र जरांगे पाटील यांच्या विरोधात मोर्चा खोलल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षण आंदोलन सुरू असतानाही लक्ष्मण हाके यांच्याकडूनही उपोषण करण्यात आले. तर सदावर्ते यांनी न्यायालयीन मार्ग निवडला होता. हे सर्वच विरोधक पुन्हा एकत्र आले आहेत.

Manoj Jarange Patil
Maharashtra BJP : पद, निवडणुकीत उमेदवारी पाहिजे तर सदस्य नोंदणी वाढवा; भाजपचा फंडा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com