Manoj Jarange patil sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मराठा आंदोलकांची चिंता वाढली! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, तापाने फणफणले!

Manoj Jarange Patil health update today : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची ताजी अपडेट जाणून घ्या.

Jagdish Pansare

Maratha Aarakshan news : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून अंतरवाली सराटीत परतले होते. सातत्याने प्रवास, दौरे , भाषण आणि त्यातून होणारी दगदग याचा परिणाम मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडण्यात झाला आहे.

काल रात्री अचानक त्यांचे अंग तापाने फणफणले, 102 इतका ताप भरल्यामुळे त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतरही मराठा कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही, जी प्रमाणपत्र दिली गेली तीही रद्द करण्यासाठी सत्ताधारी मंत्री तहसीलदारांना पत्र देत आहेत,असा आरोप जरांगे पाटील यांनी नुकताच केला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या त्यांच्या निशान्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यांमध्ये त्यांच्या सभांमधून राज्य सरकार विशेषता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.

पहिल्यांदाच शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याच पक्षाचे मंत्री संजय शिरसाठ यांच्यावरही जरांगे यांनी निशाणा साधला होता. मराठवाड्यातील काही जिल्हा परिषद सदस्य व नगरपालिकेतील नगरसेवकांचे मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट पासून पुन्हा उपोषणाची तयारी सुरू केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत त्यांनी मिळालेल्या प्रतिसादावरून आगामी आंदोलन हे अधिक तीव्र आणि आक्रमक करण्याचा निर्धार केला आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा यशस्वी दौरा करून आल्यानंतर अंतरवाली सराटीत असलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती काल अचानक बिघडली. अंगदुखी आणि तापामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांनी प्रकृती बरी नसल्याची तक्रार करताच रात्री उशिरा त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयातच विश्रांती घ्यावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT