CJP News : स्वातंत्र्यदिनीच 'काॅक्रोच'चा आवाज दाबायचा प्रयत्न! 'इन्स्टाग्राम पेज लॉक' झाल्यावर अभिजीत दीपके आक्रमक; नक्की काय घडलं?

Cockroach Janata Party Abhijeet Dipke latest news : स्वातंत्र्यदिनी अभिजीत दीपकेंचं Instagram पेज लॉक झाल्यानंतर ते आक्रमक झाले. नेमकं काय घडलं? ‘काॅक्रोच’ प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Cockroach Janata Party Abhijeet Dipke latest news
Cockroach Janata Party Abhijeet Dipke latest newsSarkarnama
Published on
Updated on

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) अधिकृत Instagram पेजवर लॉक लागल्याची माहिती समोर आल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, X पोस्टद्वारे संबंधितांवर थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे CJP Instagram Account Lock नेमके का झाले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

15 ऑगस्टच्या सकाळी अभिजीत दीपके यांनी X वर एक फोटो शेअर करत लिहिले, “त्यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल काढून टाकले. अत्यंत भित्रे लोक!” यासोबत त्यांनी “Bloody cowards!” असा उल्लेखही केला. स्वातंत्र्यदिनीच CJPचे Instagram अकाउंट लॉक झाल्याने या घटनेमागचे नेमके कारण काय, याची चर्चा सुरू झाली.

मात्र, काही वेळानंतर CJPच्या अधिकृत X अकाउंटवरून हे Instagram खाते पुन्हा मिळवल्याची माहिती देण्यात आली. पोस्टमध्ये म्हटले आहे, “आज सकाळी CJP चे इंस्टाग्राम हँडल बंद करण्यात आले होते. परंतु, आम्ही ते खाते यशस्वीपणे पुन्हा मिळवले आहे.”

Cockroach Janata Party Abhijeet Dipke latest news
PM Narendra Modi : स्वातंत्र्यदिनी PM नरेंद्र मोदींचे देशातील Gen Z साठी आतापर्यंतची मोठी घोषणा 'विकसित भारत' संकल्पांतर्गत...

तसेच या पोस्टमधून पुढे संताप व्यक्त करत म्हटले आहे, “किती दुर्दैवी बाब आहे की, CJP ला विरोध करणाऱ्यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यदिनाची निवड केली. अशा भ्याड कृत्यांनी आम्ही मुळीच घाबरणार नाही!”

दरम्यान, CJPचे Instagram पेज कोणत्या कारणामुळे लॉक किंवा डाउन झाले होते, याबाबत Instagram किंवा संबंधित प्लॅटफॉर्मकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.

CJPची सुरुवात कशी झाली?

भारताचे सरन्यायाधीश CJI सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर अभिजीत दीपके यांनी विरोध व्यक्त करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे सोशल मीडिया पेज सुरू केले होते. अल्पावधीतच X आणि Instagram वर CJPची मोठी चर्चा झाली आणि या पेजला लाखो लोकांनी फॉलो केल्याचा दावा करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com