Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 15 जातींचा ओबीसीत समावेश, मनोज जरांगे भडकले; म्हणाले, 'आमच्या डोळ्यात...'

Manoj Jarange Patil government recommend inclusionof 15 castes to obc : आम्हाला माहीत होते छोट्या जाती तुम्ही पोटजातींचा म्हणून ओबीसीत समावेश केला. मग मराठा-कुणबी एक असताना का नाही समावेश केला, असे प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला,

Roshan More

Manoj Jarange Patil News : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील 15 जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याची शिफारस केली आहे. मागासवर्ग आयोगाकडून समावेश करण्यात आलेल्या जातींची यादी केंद्राला सुपूर्द करण्यात आली आहे. त्यामुळे या 15 जातींचा केंद्राच्या यादीमध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राज्य सरकारने शिफारस केलेल्या जातींमध्ये मराठा जातीचा समावेश नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

'मराठ्यांची फसवणूक आहे. हे जाणूनबुजून अन्याय करतायेत. बाकींच्या जाती आरक्षणात जातायेत मग मराठे का नाही जाऊ शकतं. सरकारने मराठ्यांच्या डोळ्यात चटणी फेकली', अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी सरकारच्या निर्णयावर दिली.

मागच्या दोन महिन्यापांसून सरकार छोट्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करणार आहेत, हे आम्हाला माहीत होते. पोटजाती म्हणून तुम्ही समावेश केला. मग मराठा-कुणबी एक असताना का नाही समावेश केला, असे प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला,

जाणूनबुजून आपल्या लेकरांच्या मागे लागले आहेत. म्हणून मी म्हणतोय मराठ्यांनो खडबडून जागे व्हा. ओबीसीत समावेश केला नाही तर तुमच्या सर्व सीटा पाडणार, असे चॅलेंज देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे.

हे मराठाद्वेषी आहेत. जाणूनबुजून हे करत आहेत. मराठा समाजा आंदोलन करतोय. मागणी करतोय. पण हे दाखवतायेत की आम्ही तुम्हाला मोजत नाही.जे करायचे ते करा, हे दाखवत आहेत. ही एक प्रकारची खुन्नस आहे. सरकार किती जातीवादी आहे, हे यातून दिसून येतंय.

ओबीसीत समावेश झालेल्या 15 जाती

केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेल्या 15 जातींच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे. या जातींत बडगुजर,सूर्यवंशी गुजर,लेवे गुजर,रेवे गुजर,रेवा गुजर,पोवार भोयार पवार कपेवार,मुन्नार कपेवार,मुन्नार कापू,तेलंगा,तेलंगी,पेंताररेड्डी,रुकेकरी,लोध लोधा लोधी,डांगरी यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT