Manoj Jarange News : जरांगेंविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; डॉक्टरच्या तोंडाला फासलं काळं

Nashik News : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत.
Sambhaji Brigade
Sambhaji Brigade Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करीत राज्य सरकारकडे मागण्या लावून धरल्या आहेत. त्यातच त्यांच्या विरोधात एका डॉक्टराने सोशल मीडियावरून पोस्ट केली होती.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात डॉक्टराने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे संतापलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरवर शाईफेक केली.

संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) पदाधिकाऱ्यांकडून नाशिकच्या सिडको भागातील आयुर्वेद वैद्य डॉ. विजय गवळी यांचा निषेध करण्यात आला. डॉ. विजय गवळी यांच्यावर शाईने भरलेली बॉटल रिकामी करण्यात आली. इतकंच नाहीतर यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. हा सगळा प्रकार सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ केला.

जरांगे पाटील यांचे सगेसोयरे एका विशिष्ट समाजाचे असल्याची पोस्ट डॉक्टराने केली होती. या पोस्टमुळे आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी सिडको येथील विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्या अंगावर शाई फेकत निषेध व्यक्त केला.

Sambhaji Brigade
Congress Politics : नागपुरचे निरीक्षक गायब, काँग्रेस इच्छुकांची धाकधूक वाढली

या घडलेल्या प्रकारानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरला माफी मागण्यास सांगितली. या प्रकारानंतर मी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमस्व, असे डॉ. विजय गवळी यांनी म्हटले आहे.

Sambhaji Brigade
MVA News : धारावीत 'सांगली'ची पुनरावृत्ती; काँग्रेसच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com