Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj jarange Patil Security : मनोज जरांगे पाटलांना सरकार 'Z+ सिक्युरिटी' पुरवणार ?

Manoj jarange Patil Security : मनोज जरांगेच्या जिवाला धोका ?

Chetan Zadpe

Manoj jarange Patil Security : मराठा आरक्षणासाठी आपले प्राण पणाला लावणारे मनोज जरांगे पाटील यांनी तूर्त तरी उपोषणाला स्थगिती दिली आहे. मात्र, राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांतील अनेक गावागावांत साखळी आंदोलनं सुरू आहेत. शासनाने आणखी मुदत घेतली आहेच तर आता आरक्षण मिळालंच पाहिजे. आंदोलन स्थगित झालं आहे, समाजाचा आक्रोश नाही. त्यामुळे सरकारने हे सगळं गांभीर्यानं घ्यावं, जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली. (Latest Marathi News)

मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय माझ्या घराचा उंबरा मी शिवणार नाही, अशी प्रतिज्ञा जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला दिलेल्या डेडलाइनच्या दरम्यानच्या कालावधीत ते विविध जिल्ह्यांत दौरा करण्याची शक्यता आहे. या दरम्यान त्यांच्या जिवाला धोका असू शकतो, म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार त्यांना सुरक्षा पुरवते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारला अल्टिमेटम -

"टिकणारे आणि सरसकट आरक्षण देण्यासाठी वेळ लागणार आहे. यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत, त्या दूर करायच्या आहेत", असे धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांना सांगितले, तर "सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असेल तर आपण सरकारला वेळ देण्यास तयार आहोत", असे सांगत उपोषण तूर्तास मागे घेण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला.

सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरची नवी डेडलाइन दिली होती, पण शिष्टमंडळाने 2 जानेवारीपर्यंत वेळ मागितला. त्यामुळे आता डेडलाइनबाबत सरकार आणि जरांगेंच्या दाव्यावरून घोळ होत आहे. मात्र, जरांगें यांचं उपोषण मागे घेण्यात सरकारच्या शिष्टमंडळाला यश आले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT