Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या डेडलाइनवर घोळ; 24 डिसेंबर की 2 जानेवारी? जरांगे म्हणतात...

Manoj Jarange Patil News : "२४ डिसेंबर हीच डेडलाइन आहे. हे लेखी दिलेलं आहे. त्यामुळे तारीख बदलू देणार नाही."
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Marathwada News : मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले उपोषण त्यांनी स्थगित केले आहे. गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळानी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर "सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असेल, तर आपण सरकारला वेळ देण्यास तयार आहोत", असे जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाला सांगितले. मात्र, आता आरक्षण जाहीर करण्याच्या डेडलाइनवर आता संभ्रम सुरू झाले आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange
Parbhani BJP News : समीर दुधगावकर वैतागले, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत भाजपला सोडचिठ्ठी...

सरकारला आरक्षण करण्यासाठी जरांगे पाटील यांनी २ जानेवारीरपर्यंतची डेडलाइन दिली असल्याची माहिती माध्यमांमध्ये झळकत होती, तर आता जरांगे यांच्या ताज्या विधानामुळे डेडलाइनबाबत नव्याने संभ्रम निर्माण झाले आहेत. जरांगे म्हणाले, "सरकारच्या शिष्टमंडळाने २४ डिसेंबरपर्यंत वेळ द्यावं लागेल असं म्हटलं. समितीला काम करायला वेळ लागेल, असं शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं, पण २४ डिसेंबर हीच डेडलाइन आहे. हे लेखी दिलेलं आहे. त्यामुळे तारीख बदलू देणार नाही. यामध्ये कसलीच अॅडजेस्टमेंट होणार नाही."

Manoj Jarange
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंनी हात जोडले अन् जरांगे पाटील एक पाऊल मागे आले...

जरांगे म्हणाले, "इतका वेळ देऊन काय झालं, आता पुन्हा तुम्हाला ५० दिवस दिले आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊन सरसकट आरक्षण दिलं पाहिजे. शासनाची शिंदे समिती काम करत आहे, राज्य मागासवर्ग आयोग काम करत आहे. कायदेशीर सल्लागार समितीही काम करत आहे, त्यामुळे ही घटना खूप मोठी आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com